कृषिराज शुगरचा द्वितीय बॉयलर अग्नी प्रदीपन 

rushiraj sugers.png
rushiraj sugers.png

भोसे(सोलापूर): कै. यशवंतभाऊ पाटील व कै. राजूबापू पाटील यांच्यावर जो विश्वास दाखवला या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच इतर कारखान्याच्या बरोबरीने दर देऊ, अशी ग्वाही कृषिराज शुगरचे कार्यकारी संचालक गणेश पाटील यांनी दिली. 

भोसे (ता. पंढरपूर) येथील कृषिराज शुगरच्या द्वितीय बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभानिमित्त ते बोलत होते. अतिशय भावनिक वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. कारण कारखान्याचे मार्गदर्शक कै. राजूबापू पाटील व कारखान्याचे चेअरमन महेश पाटील या दोघांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या अनुपस्थितीत हा सोहळा पार पडत असल्याने वातावरण भावनिक झाले होते. कै. यशवंतभाऊ पाटील व कै. राजूबापू पाटील यांचे सहकारी व जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन झाले. त्यानंतर झालेल्या छोटेखानी सभेत गणेश पाटील म्हणाले, कारखान्याची तोडणी वाहतूक तसेच अंतर्गत सर्व कामे पूर्ण झाली आहेत. गतवर्षीची सर्व बिले अदा केली आहेत. कारखाना सुरू करण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेऊन साधारण आठ ते दहा दिवसात कारखाना सुरू करणार असल्याचे सांगितले. 

सुरवातीला जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात यांनी कोरोना या महामारीत दिवंगत झालेले अनंतराव पाटील, राजूबापू पाटील, महेश पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष वैजिनाथ कोरके व त्यांचे पुत्र बाळासाहेब कोरके यांना श्रद्धांजली अर्पण करून कारखान्याची रूपरेषा सांगितली. यावेळी सेवानिवृत्त कृषीमंडल अधिकारी शहाजीराव पाटील यांनी भाऊ बापूंना ज्याप्रमाणे साथ दिली त्याचप्रमाणे गणेश पाटील यांनाही साथ द्यावी असे भावनिक आवाहन केले. 
यावेळी मेंढापूर पंचायत समिती सदस्य धोंडीराम गवळी, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुधीर भोसले, भोसे सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, चांगदेव जमदाडे, दामु कोरके, दामू माळी, उद्धव कोरके, मधुकर माळी, बलभीम गावडे, अनंत टरले, हाशिम शेख, संचालक शेखर पाटील, धैर्यशील पाटील, जयवंत गावंधरे, सुनील तळेकर, आशिष पाटील, प्रशाद पाटील, नागनाथ भांडे, दिलीप पवार आदी उपस्थित होते. यावेळी भोसे तसेच खेडभोसे, पांढरेवडी, नेमतवाडी, होळे, पंढरपूर आदी भागातून शेतकरी उपस्थित होते.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com