सोलापूरच्या तेजस्विनीला ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 3 मार्च 2020

नावातच तेज असलेल्या माझ्या मुलीने सुरवातीपासूनच अपार कष्ट घेतले. त्याचेच फळ म्हणून आज तीला राष्ट्रीय पारितोषकाच्या रुपाने मिळाले आहे. तिच्या या यशाचे निश्‍चितच आम्हाला कौतुक आहे. भविष्यातही ती अशीच भरारी घेऊन चित्रकारीता क्षेत्रात सोलापूरसह आपल्या देशाचे जगात नावलौकीक करेल याचा विश्‍वास आहे. 
- नारायण सोनवणे, तेजस्विनी यांचे वडील 
निवृत्त कार्यकारी अभियंता, महावितरण 

 
सोलापूर : येथील तेजस्विनी नारायण सोनवणे यांना ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या (बुधवारी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्काराचे नवी दिल्लीत वितरण होणार असून, दोन लाख रुपये व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ४ लोक, Tejswini Sonawane समाविष्टित, लोक हसत अाहेत, लोकं उभी आहेत आणि लग्न सोहळा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते तेजस्विनी यांचा मुंबईत सन्मान करण्यात आला. 

ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी काल रात्री नवीन दिल्लीत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सोनवणे यांच्यासह देशभरातील 14 जणांचा समावेश आहे. महावितरणमधील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे यांच्या त्या कन्या आहेत. तेजस्विनी सोनवणे यांना उत्कृष्ट कलाकृतीबद्दल 2005 पासून तीन वेळा कोरसाला वंडर आर्ट (इंटरनॅशनल) हैदराबाद या संस्थेकडून सुवर्णपदक मिळाले आहे. "अवंतिका' नवी दिल्ली या संस्थेनेही 2006 मध्ये तिला सुवर्णपदकाने गौरविले आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील चित्रकला प्रदर्शन, स्पर्धेत तिने बक्षिसे पटकाविली आहेत. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ७ लोक, Narayan Sonawane आणि Tejswini Sonawane समाविष्टित, लोक हसत अाहेत
कुटुंबियांसमवेत तेजस्विनी सोनवणे

तेजस्वीनी यांनी भारती विद्यापीठ फाईन आर्ट महाविद्यालय (पुणे) येथून बॅचलर ऑफ फाईन आर्ट या चित्रकला पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण होण्याचा मान पटकाविला. त्या सोलापुरातील अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयातून जीडी आर्टची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. दक्षिण कोरिया येथील बुसान शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्ट फेअरमध्ये सोलापूरची तेजस्विनी सोनवणेचा सहभाग होता. तेजस्विनीने कर्मवीर अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयातून शिक्षण घेतले. पुणे येथील भारती विद्यापीठात पदवीचे तर सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून मास्टर ऑफ फाईन आर्टचे शिक्षण तेजस्विनीने घेतले आहे. 2015 मध्ये प्रफुल्ला डहाणूकर फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक व 50 हजारांचे रोख बक्षिस तेजस्विनीने पटकाविले होते. बॉम्बे आर्ट गॅलरी मुंबई, संस्कृती आर्ट गॅलरी पुणे येथे तेजस्विनीच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच भारतातील पटना, दिल्ली, कोलकता, मुंबई, भुवनेश्‍वर, खजुराहो येथील चित्र प्रदर्शनात तेजस्विनीचा सहभाग होता. 

 

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद वाटला. माझ्या वाटचालीत आई-वडिलांसह मार्गदर्शकांचा सहभाग आहे. भविष्यातही चित्रकला क्षेत्रात चांगले काम करून आपल्या गावाचे, देशाचे नाव लौकीक करण्याचा प्रयत्न असणार आहे. 
- तेजस्विनी सोनवणे, सोलापूर 
ललित कला अकादमी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 

ही आहे पुरस्कार विजेत्यांची यादी...
 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lalit kala akadami award to tejaswini narayan sonawane of solapur