जयभवानी प्रशालेत विरंगुळा केंद्राची पायाभरणी ! कोठे म्हणाले, आयत्या बिळावर नागोबा तर देशमुख म्हणाले, मी निधी दिला

तात्या लांडगे
Sunday, 24 January 2021

...त्या लोकांनी मला कार्यक्रमाचे दिले निमंत्रण
नामदेव शिंपी समाजातील लोकांसाठी माझ्या प्रयत्नातून समाज मंदिरासाठी त्यावेळी निधी दिला. वेळोवेळी निधी उपलब्ध करुन देत असतानाच भाजप सरकारने अर्धवट राहिलेल्या कामासाठी मंजूर झालेला निधी अडविला. त्या समाजातील लोकांना माहिती आहे की, काम नेमके कोणी आणि कोणाच्या प्रयत्नातून झाले आहे. ज्या समाजासाठी ते समाजमंदिर आहे, नामदेव शिंपी यांचे नावदेखील दिलेले नाही. त्यामुळे ते लोक कार्यक्रमाला या म्हणून माझ्याकडे आले आहेत. भाजपने सुरवातीपासून अडवाअडवीची भूमिका घेतली. आता मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्याने भाजपवाल्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे झालेल्या कामाचे नाव बदलून कार्यक्रम केला जात आहे, असे महेश कोठे यांनी स्पष्ट केले.

सोलापूर : जयभवानी प्रशालेच्या प्रारंगणातील विरंगुळा केंद्राची उद्या (रविवारी) उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र, त्या कार्यक्रमाची पत्रिका नगरसेवक सुरेश पाटील यांनी महापालिकेच्या नावे असलेल्या व्हॉट्‌सअप ग्रूपवर टाकली. त्यानंतर 'आयत्या बिळावर नागोबा का' अशी पोस्ट महेश कोठे यांनी टाकली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच शहर उत्तर विधानसभा मतदारसंघावरून कोठे व देशमुख हे दोघे आमने- सामने येत आल्याची चर्चा सुरु झाली आहे.

...त्या लोकांनी मला कार्यक्रमाचे दिले निमंत्रण
नामदेव शिंपी समाजातील लोकांसाठी माझ्या प्रयत्नातून समाज मंदिरासाठी त्यावेळी निधी दिला. वेळोवेळी निधी उपलब्ध करुन देत असतानाच भाजप सरकारने अर्धवट राहिलेल्या कामासाठी मंजूर झालेला निधी अडविला. त्या समाजातील लोकांना माहिती आहे की, काम नेमके कोणी आणि कोणाच्या प्रयत्नातून झाले आहे. ज्या समाजासाठी ते समाजमंदिर आहे, नामदेव शिंपी यांचे नावदेखील दिलेले नाही. त्यामुळे ते लोक कार्यक्रमाला या म्हणून माझ्याकडे आले आहेत. भाजपने सुरवातीपासून अडवाअडवीची भूमिका घेतली. आता मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्याने भाजपवाल्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे झालेल्या कामाचे नाव बदलून कार्यक्रम केला जात आहे, असे महेश कोठे यांनी स्पष्ट केले.

शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील जयभवानी प्रशालेतील मैदानावर यापूर्वी समाजमंदिर उभारण्यात आले. कॉंग्रेसमध्ये असताना तत्कालीन सभागृह नेते महेश कोठे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी खासदार सुशिलकुमार शिंदे यांच्या माध्यमातून या कामासाठी निधी आणला. मात्र, चौहूबाजूंनी भिती आणि खिडक्‍याचे काम केल्या आणि छत घातलेच नाही. त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख हे पालकमंत्री असताना त्यांनी जिल्हा नियोजन समितीतून या कामासाठी 24 लाख 90 हजारांचा निधी दिला. आता या कामाचा शुभारंभ होणार असून त्यासाठी श्री विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार विजयकुमार देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, नगरसेवक सुरेश पाटील, संजय कोळी, नगरसेविका अंबिका पाटील, विजयालक्ष्मी गड्डम, सचिन कुलकर्णी, सुधाकर नराल आदी उपस्थित राहणार आहेत, असे कार्यक्रम पत्रिकेवरील नगरसेवकांनी सांगितले.

असले कुठे काम असते का?
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्या प्रयत्नातून जयभवानी प्रशाला परिसरात समाज मंदिर बांधले. त्याठिकाणी चौहूबाजूंनी भिंती आणि खिडक्‍या बसविल्या, मात्र छतच टाकला नाही. मी पालकमंत्री असताना उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून सुमारे 25 लाखांचा निधी दिला. आता त्या कामाचा शुभारंभ केला जाणार आहे. परंतु, त्याठिकाणी उभारलेल्या समाजमंदिराचे काम मी पहिल्यांदाच पाहिले. अशाप्रकारचे काम कधीच कुठे पाहिले नाही आणि मी विनाकारण श्रेय घेत नाही. काम केल्यानंतर अथवा संबंधित कामासाठी निधी दिल्यानंतरच त्या कामाचे भूमिपूजन अथवा लोकार्पण करतो, असे स्पष्टीकरण आमदार विजयकुमार देशमुख यांनी 'सकाळ'शी बोलताना दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laying of foundation of Virangula Kendra at Jayabhavani School; Deshmukh's eye on the work I have done, by blocking funds the same work is being done again