उदयनराजेंसाठी काय पण... तरुणाने लिहिले रक्ताने पत्र

अशोक मुरूमकर
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

2019च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती उदयनराजे हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडूनआले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपत प्रवेश केला.

सोलापूर : छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यसभा तसेच केंद्रीय मंत्रिपद द्यावे, या मागणीसाठी साताऱ्यातील तरुणाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. या पत्राची प्रत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या फेसबुक वॉलवर टाकण्यात आली आहे. 
2019च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती उदयनराजे हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडूनआले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीवेळीच त्यांनी लोकसभेची पोटनिवडणूक लढवली, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांना भाजपने केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत. यातूनच साताऱ्यातील नीलेश जाधव या तरुण कार्यकर्त्याने गृहमंत्री अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. यात त्याने नमूद केले की, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांना राज्यसभेवर खासदार करून मंत्रिपद देऊन छत्रपतींच्या गादीचा सन्मान करावा.' 
या पत्राचे व तरुणाचे फोटो छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या फेसबुक वॉलवर टाकण्यात आले आहेत. यात नमूद की, "राज्यसभा तसेच केंद्रीय मंत्रिपद द्यावे, या मागणीसाठी साताऱ्यातील नीलेश जाधव या तरुण कार्यकर्त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. या दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार. परंतु स्वत:चा जीव धोक्‍यात घालून केलेला हा प्रयत्न मला नक्‍कीच रुचला नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचा जीव माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. हे असे प्रकार मला नक्कीच आवडणार नाहीत, कोणीही असे प्रयत्न करू नयेत हीच सर्वांना विनंती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let the Udayan Rajin minister with the youth blood letter