Shivjayanti2020 : छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे पाहिलीत का

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

जगभरातील छायाचित्रांचा आहे समावेश
गभरातील विविध संग्रहालयात असलेल्या छायाचित्रांचा त्यात समावेश आहे, याशिवाय अतिशय वाचनीय व संग्रही माहितीही आहे. केवळ शिवभक्तांनीच नव्हे तर महाराष्ट्र आणि छत्रपतींचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही ही माहिती असायलाच हवी.

सोलापूर ः  महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची दुर्मिळ छायाचित्रे येथील शिवभक्‍त दास शेळके यांनी सोशल मिडीयावर प्रसिद्ध केली आहेत. काही छायाचित्रे ही शिवाजी महाराज यांच्या हयातीत, तर बहुतांश त्यांच्या मृत्यनंतर साकारण्यात आली आहेत. शिवजयंतीनिमित्त चला माहिती घेऊयात या दुर्मिळ छायाचित्रांची....

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक

किशनगड चित्रशाळा 
भारतात किशनगड मधील चित्रशाळा प्रसिद्ध आहे. किशनगड चे महाराज सावंतसिंग आणि त्यांचे चित्रकार निहाल चंद ह्यांच्या काळात ही चित्रशैली प्रसिद्धीस आली. हे चित्र नंतर काढलेले असावे. चित्रामध्ये काही प्रमाणात सुवर्णकाम केलेले दिसून येते. चित्रामध्ये महाराजांनी उजव्या हातात दक्‍खनी धोप तलवार तर डाव्या हातात पट्टा घेतलेला दाखवला आहे. हे चित्र सध्या बॉनहॅम्स कॉलेक्‍शन लंडन येथे आहे. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती

राजपूत शैली 
हे शिवरायांचं पूर्णाकृती चित्र राजपूत-मुघल शैलीत काढले असून, 18 व्या शतकातील आहे. ह्या मध्ये महाराजांच्या उजव्या हातात फुल डाव्या हातात पट्टा तर कमरेला ढाल आहे. हे चित्र बडोदा संस्थानच्या गायकवाड यांनी बडोदा संस्थान संग्रहालयाला भेट दिला. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती

रॉबर्ट आर्म कॉलेकशन 
1872 मध्ये प्रसिद्ध झालेल्या रॉबर्ट आर्म ह्यांच्या 'historical fragments' ह्या पुस्तकात शिवरायांच हे चित्र छापण्यात आले होते. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती

फ्रान्स राष्ट्रीय ग्रंथालय 
1865 साली गोवळकोंडा येथे काढलेले शिवरायांचे चित्र आज फ्रान्स राष्ट्रीय ग्रंथालयात ठेवलेले आहे. ह्या चित्रात वृद्धापकाळाकडे झुकलेले शिवराय दिसतात. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक

छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय 
हे प्रसिद्ध चित्र मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवलेलं आहे. तिथे प्रवेशद्वार मध्ये मोठ्या आकाराचे चित्र ठेवलेले आहे. मूळ चित्र हे आकाराने लहान आहे. नंतर गोवळकोंडा येथे हे चित्र काढलेले असावे असा अंदाज आहे. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती, मजकूर

रिक्‍स म्युझीयम
शिवरायांचे हे चित्र हॉलंड मधील रिक्‍स म्युझियम मध्ये ठेवलेले आहे. हे चित्र 1680 मधील असल्याची तिथे नोंद आहे. चित्रात महाराजांनी उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात पट्टा घेतला आहे. चित्राच्या खाली 'Sivagi' लिहिलेले आहे. 

स्मिथ लेसोफ कॉलेक्‍शन 
शिवाजी महाराजांचे उभे असलेले हे चित्र आहे. ह्या चित्र मध्ये उजव्या हातात तलवार व डाव्या हातात पट्टा आहे. हे चित्र फ्रांस च्या राष्ट्रीय ग्रंथालयात ठेवलेले असून हे 17 व्या शतकाच्या शेवटी काढलेले असावे. 

बर्लिन स्टेट लायब्ररी 
जर्मनी मधील बर्लिन स्टेट लायब्ररी मध्ये हे चित्र ठेवलेले आहे. ह्या चित्रावर 'Siuwagie gewerzere maratise vorst' लिहिलेले असून ह्याचा अर्थ 'मराठ्यांचा राजा' असा होतो. हे चित्र 17 व्या शतकाच्या शेवटी काढलेले असून, ते तत्कालीन भारतातून हॉलंड नंतर तेथून जर्मनी मध्ये नेण्यात आले. 

निकोलस विटसेन संग्रह 
हॉलंड मधील रिक्‍स म्युसीयम मध्ये ठेवलेले हे चित्र आहे. 1675 - 1685 असा ह्या चित्राचा कालखंड मानला जातो. ह्या चित्रावर 'Siwagii prince in decam' असे लिहलेले आहे. 

गिमे म्युसीयम 
फ्रांस मधील पॅरिस येथील गिमे संग्रहालयात हे चित्र ठेवलेले आहे. ह्या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यात शिवाजी महाराजांचा पूर्ण चेहरा दिसतोय. 

ब्रिटिश म्युझीयम लंडन 
लंडन येथे ठेवलेले शिवरायांचे चित्र प्रसिद्ध आहे. 'Potraits of Indian princes' ह्या चित्रसंग्रहात हे ठेवण्यात आले आहे. हे चित्र गोवळकोंडा येथे काढलेले असून त्याचा काळ 1680-1685 असा नोंदवला आहे. 

जयपूर पोथीखाना 
अंबर राजघराण्याचे वयक्तिक दप्तर म्हणजेच जयपूरचा "जयपूर पोथीखाना' येथे हे चित्र सापडले असून ते 18 व्या शतकातील आहे. चित्रामध्ये महाराजांनी उजव्या हातात खंजीर, डाव्या हातात फुल, कमरेला ढाल आणि तलवार लटकावलेली दिसत आहे. 

अश्वारूढ शिवराय 
हे चित्र आँटोंन झेनेटी ने काढलेले असून, ह्याचा कालखंड 1705-1741 असा आहे. झेनेटी ने हे चित्र निकोलस मनूची साठी काढलेले असण्याची शक्‍यता आहे. मूळ चित्र copper engraved असून त्यावर रंगकाम केलेले आहे. 

मनूची चित्र संग्रह 
शालेय अभ्यासक्रमात सर्वांनी पाहिलेले हे चित्र निकोलस मनूची यांनी मीर महंमदकडून काढून घेतले. पुरंदर तहाच्या वेळी मनूची आणि शिवरायांची सर्व प्रथम भेट झाली. हे चित्र सध्या पॅरिस मध्ये आहे. 

लेनिनग्राड 
इंडियन मिनिएचर्स ह्या चित्रसंग्रहात प्रसिद्ध झालेले हे चित्र बर्लिन चित्राशी मिळते जुळते आहे. हे चित्र हॉलंड मधून प्राप्त झाले असून, सध्या रशियन लायब्ररी मध्ये आहे 

सरस्वती महाल संग्रहालय 
शहाजी महाराज (गादीवर बसलेले) आणि त्यांची दोन पुत्र संभाजी (पुढे बसलेले) आणि शिवाजी (पाठीमागे बसलेले) असं ह्या चित्रच स्वरूप असून ते तंजावर मधील भोसले घराण्याने व्या शतकात काढले. ह्या चित्रची अजून एक प्रत ही फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याकडे आहे. 

फ्रांस्वा वॅंलेंटीन संग्रह 
भिंतीवर हात ठेवलेले शिवरायांचे वैशिष्ट्यपूर्ण चित्र हे फ्रांस्वा वॅंलेंटीन ह्या डच अधिकाऱ्याच्या संग्रहातील आहे. हे चित्र 1782 मध्ये प्रसिद्ध झाले असून, ते 1712 च्या आधीचे असण्याचा अंदाज आहे. चित्रावर 'den heer Seva Gi' लिहलेले आहे. 

चला ऐकूया शिवभक्त श्री. दास शेळके यांचे मनोगत (VIDEO) 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lets see a rare photo of Chhatrapati Shivaji Maharaj