बालग्राम, वृद्धाश्रम उभारणीसाठी जमा केलेली पुंजी लॉकडाउनमध्ये अन्नदानासाठी खर्च 

In Lockdown the Prarthana Foundation nurtures social commitment
In Lockdown the Prarthana Foundation nurtures social commitment

मळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हाताला काम नाही व खायला अन्न नाही अशातच अन्नाअभावी अनाथ, बेघर, निराधार, मजूर यांची उपासमार होऊ लागली आहे. त्याचाच भाग म्हणून सोलापूर शहरातील प्रार्थना फाऊंडेशनने दोन पाऊल पुढे येत सामाजिक बांधिलकी जोपासली. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून दररोज 300 पेक्षा जास्त लोकांना अन्नदान, 1150 कुटूंबाला अन्नधान्य व जीवनावश्‍यक वस्तूचे किट वाटप, 24 हजार लोकांना अन्नदान करून प्रार्थना फाउंडेशन एक माणुसकीचा माइललस्टोन बनले आहे. बार्शी तालुक्‍यातील इर्लेवाडी सारख्या लहान खेड्यातत जन्मलेले प्रसाद मोहिते लॉकडाऊनच्या काळात इतरांसाठी देवदूत बनला आहे. 

वडिलांचं हरवलेलं छत्र, घराचं गळक छत, पडलेल्या भिंती, काळ्या भुईंन सोडलेली साथ आशा घडलेल्या दुःखद घटना प्रसादसाठी जगण्याची उमेद निर्माण करणाऱ्या ठरल्या. लॉकडाउन काळात त्यांनी माणुसकीची भिंत कधीच कोसळू दिली नाही. अशा खडतर प्रसंगात आई संगीता मोहिते व पत्नी अनु मोहिते यांनी दिलेली साथ व आधार मोलाचा ठरला. आश्रम उभारणीसाठी स्वतःची 5 एकर जमीन विकली त्यातून उभा केलेली रक्कम, दानशूरांनी केलेली मदत, पुरस्कारातून मिळालेली रक्कम लॉकडाऊन काळात कोणाचा भूकबळी जाऊ नये म्हणून अन्नदानासाठी खर्च केली. रक्कम कधीही उभा करता येईल पण लाख मोलाची माणस गमावली तर ती परत येणार नाहीत या भावनेने मोहिते दाम्पत्य सामाजाची मनोभावे सेवा करीत आहेत. हातावरचे पोट असणारे मजूर, परराज्यातील कुटूंब, विद्यार्थी, समाजातील तृतीयपंथी बांधव, झोपडपट्टीतील गरीब कुटुंब या सर्वांना प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून अन्नदानाची मदत पोचवली जात आहे. रमजान ईदच्या दिवशी मिठाईचे वाटप करून माणुसकी हाच खरा धर्म आहे, हा संदेश दिला गेला. भूक लागली म्हणून माती खाणाऱ्या भकेलेल्याला अन्न व पाणी देऊन भुकेला कोणती जात, कोणता धर्म आणि भाषा नसते हे प्रसादने दाखवून दिले.

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com