धक्कादायक! "या' तालुक्‍यात पाच अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार; दोन संशयित आरोपींपैकी एक अल्पवयीन

अक्षय गुंड
Wednesday, 16 September 2020

महातपूर गावातील दोन युवक ज्यांचे वय 18 व एक अल्पवयीन 16 वर्षांचा आहे, त्यांनी शनिवारी (11 सप्टेंबर) गावातील एका अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने घरातून नेऊन लैंगिक हेतूने अनैसर्गिक कृत्य केले. तो पीडित अल्पवयीन मुलगा घाबरलेल्या स्थितीत घरी गेला. आजोबांनी घाबरण्याचे कारण विचारले, परंतु संशयित आरोपींनी कोणालाही सांगितल्यास सपकाविन, अशी धमकी दिली असल्याने त्या मुलाने घरी काहीच सांगितले नाही. 

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : राज्यात महिला व मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या असताना, आता यात अल्पवयीन मुलांचा समावेश देखील मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. महिला व मुलींबरोबरच आता लहान मुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक अशी घटना सोलापूर जिल्ह्यातील महातपूर (ता. माढा) येथे घडली आहे. दोन युवकांनी गावातीलच पाच अल्पवयीन मुलांवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (ता. 15) उघडकीस आली आहे. याबाबत माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, महातपूर गावातील दोन युवक ज्यांचे वय 18 व एक अल्पवयीन 16 वर्षांचा आहे, त्यांनी शनिवारी (11 सप्टेंबर) गावातील एका अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने घरातून नेऊन लैंगिक हेतूने अनैसर्गिक कृत्य केले. तो पीडित अल्पवयीन मुलगा घाबरलेल्या स्थितीत घरी गेला. आजोबांनी घाबरण्याचे कारण विचारले, परंतु संशयित आरोपींनी कोणालाही सांगितल्यास सपकाविन, अशी धमकी दिली असल्याने त्या मुलाने घरी काहीच सांगितले नाही. 

परंतु त्या संशयित आरोपींनी पुढे दोन-तीन दिवस सतत हे कृत्य केले. तेव्हा पीडित मुलाने ही माहिती सोमवारी (14 सप्टेंबर) त्याच्या आजोबांना सांगितली. त्याचबरोबर हे संशयित युवक गावातील इतर आणखी काही अल्पवयीन मुलांसोबत देखील लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलाच्या आजोबाने माढा पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना माढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे करत आहेत. 

याबाबत माढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने म्हणाले, की संबंधित घटनेची खातरजमा करून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Madha taluka five minors were tortured by two youths