माढा तालुक्यात बिबट्यासदृश प्राण्याचा रेडकू, शेळीवर हल्ला

In Madha taluka leopards ate goats and buffaloes
In Madha taluka leopards ate goats and buffaloes

टेंभुर्णी (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील शेवरे गावच्या परिसरात बिबट्यासदृश प्राण्याने शेतकऱ्यांच्या घरासमोर बांधलेल्या रेडकू व शेळीवर हल्ला करून शेळीला ठार केले तर रेडकू जखमी झाले. यावेळी शेतकऱ्यांनी फटाके उडवून आरडाओरड केल्यानंतर बिबट्यासदृश प्राणी उसाच्या पिकात निघून गेला आहे. सोमवारी रात्री साडेसात ते साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली. 
सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास शेवरे (ता. माढा) येथील मस्केवस्ती येथील सतीश अजिनाथ मस्के (वय 38) यांच्या शेतातील घरासमोर बांधलेले रेडकू अचानक ओरडू लागल्याने मस्के यांनी बॅटरीच्या उजेडाने पाहिले असता बिबट्यासदृश प्राणी रेडकास नरड्यास धरून ओढत होता. यामुळे मस्के यांनी त्यास ओरडून हुसकावण्याचा प्रयत्न केला, पण तो गेला नाही. यामुळे त्यांनी मुलांना घरात पाठवून स्वतः घराच्या स्लॅबवर जाऊन दगड मारले तसेच फटाके उडविले. यामुळे तो प्राणी पळून गेला असून या हल्ल्यात रेडकू जबर जखमी झाले. यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास शेवरे 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
येथील माळेगाव पाटीजवळ नागनाथ नवनाथ मस्के यांच्या दारात बांधलेल्या शेळीवर बिबट्यासदृश प्राण्याने हल्ला केला. यावेळी नागनाथ मस्के हे दूध घालण्यासाठी माळेगाव पाटी येथे गेले होते. शेळ्या ओरडू लागल्याने शेजारी राहणारे सोमनाथ केरबा मस्के व अशोक बाबूराव मस्के यांनी पाहिले असता बिबट्यासदृश प्राणी शेळीला खात होता. त्यांनी त्यास हाकलून लावण्याचा प्रयत्न केला असता तो त्यांच्यावरच गुरगुर करू लागला. यामुळे ते दोघे घाबरून गेले. मात्र एवढ्यात आवाजाने बरीच माणसे गोळा झाल्याने तो प्राणी तेथून निघून गेला. दरम्यान, मंगळवारी सकाळी वनविभागाचे वनपाल हरिभाऊ खरतोडे, वनरक्षक सुरेश कुर्ले, वनमजूर अटकळे, हरिदास मोरे यांनी घटनास्थळी जाऊन मृत शेळीचा पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांनी शेळीचे शवविच्छेदन केले. 
शेवरे येथील शेतकरी सतीश मस्के म्हणाले, बिबट्यासदृश प्राणी हा साधारण गुडघ्यापेक्षा उंच असून त्याचा जबडा मोठा होता. त्याने रेडकाच्या गळ्यावर, तोंडावर जबर चावा घेतला आहे. यामुळे रेडकू गंभीर जखमी झाले असून ते जगण्याची शक्‍यता कमीच आहे. या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्यासदृश प्राण्याला वनविभागाने तातडीने पकडून जेरबंद करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com