सोलापूरात साकारली अतिभव्य दुर्गादवी : 260 x 150 फूट आकारची खडी व रंगची प्रतीमा 

Durga devi.jpeg
Durga devi.jpeg

सोलापूर : दसरा निमित्ताने सोलापूरमधील स्पर्शरंग परिवाराचे युवा कलाकार विपुल मिरजकर आणि सहकलाकार यांनी कुचन हायस्कूलच्या मैदानावर दसऱ्याच्या सणाचे औचित्य साधून 260 x 150 फूट या आकारात भव्य दिव्य दुर्गादेवीची पाषाण खडी आणि रंगांचा वापर करून प्रतिमा साकारली. 

या प्रतिमेचे उद्‌घाटन महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी "लेक वाचवा', "बेटी बचाओ बेटी पढाओ' व महिला अत्याचार थांबावे या साठी सामाजिक संदेश दिला आहे. या कलाकृतीच्या निर्मितीसाठी 25 दिवसाचा कालावधी लागला. तसेच याची विश्वविक्रमासाठी नोंदणी केली आहे. 

जागतिक कोरोना महामारीच्या काळात सर्व सण, उत्सव आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहोत. तरी या सर्व सहकलाकारांनी मिळून एक वेगळ्या प्रकारे दसऱ्याच्या शुभ दिनी मॉं दुर्गा देवीची प्रतिमा साकारून देशवासियांना शुभेच्छा दिल्या. 
यावेळी प्रतिकृती काढलेल्या कलाकार विपुल मिरजकर, प्रमोद दासरी, निखिल तलकोकुल, शुभम कामठी, आशिष रेगल, सपोर्टिंग टीम कुचन प्रशाला सोलापूर, विशाल काळे (शिक्षक, कुचन प्रशाला, सोलापूर), विश्‍व विक्रमवीर सागर सुब्रमणी भारती यांनी सहभाग नोंदवला. या प्रतिकृतीसाठी 24 ब्रास पाषाण खडी, 150 लिटर रंग वापरण्यात आला. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक नागेश वल्याळ, सौ. बुधाराम आदी मान्यवर उपस्थित होते. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com