राज्यात 2.14 लाख एचआयव्ही बाधित ! टॉप टेनमध्ये आहेत "हे' जिल्हे; "टीएलडी'मुळे वाढतेय रुग्णांचे आयुर्मान 

hiv-aids
hiv-aids

सोलापूर : केंद्र सरकार व "नारी' या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी एचआयव्ही संशयितांची टेस्ट केली जाते. राज्यात आता "एचआयव्ही'चे दोन लाख 14 हजार रुग्ण आहेत. त्यांची रोगप्रतिकारक शक्‍ती वाढावी, आयुर्मान वाढावे म्हणून रुग्णांवर "टीएलडी' या नव्या प्रणालीद्वारे उपचार केले जात आहेत. आतापर्यंत सुमारे 30 हजार रुग्णांना नव्या प्रणालीतून उपचार दिले जात असून, पुढील तीन वर्षांत सर्वच रुग्णांना यातून उपचार दिले जाणार आहेत. 

राज्यातील एकूण एचआयव्ही बाधितांमध्ये पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली हे जिल्हे अव्वल आहेत. मागील तीन-चार वर्षांत एचआयव्ही पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात 2017-18 मध्ये एक हजार 247 रुग्ण, 2018-19 मध्ये एक हजार 168 तर 2019-20 एक हजार 76 रुग्ण आणि यावर्षी एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात 307 रुग्ण आढळले आहेत. एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांच्या माध्यमातून इतरांना त्याची बाधा होऊ नये, यादृष्टीने आता "टीएलडी' ही औषधोपचार प्रणाली विकसित केली जात आहे. एचआयव्ही बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र देशात अव्वल असून नव्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र 18 व्या स्थानावर असल्याची माहिती एड्‌स निर्मूलन प्रकल्पाच्या वतीने देण्यात आली. 

ठळक बाबी... 

  • 2017-18 मध्ये पाच लाख संशयितांमध्ये आढळले 22 हजार 104 एचआयव्ही पॉझिटिव्ह 
  • 2018-19, 2019-20 पर्यंत राज्यात (मुंबई वगळता) 38 हजार 270 रुग्णांची पडली भर 
  • दर शंभर संशयितांमध्ये आढळतोय एक रुग्ण; एचआयव्हीचा संसर्ग नव्या प्रणालीने होतोय कमी 
  • एप्रिल ते ऑक्‍टोबर 2020 या काळात आढळले पाच हजार 19 एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण 
  • एड्‌स निर्मूलन प्रकल्पाचे संचालक चंद्रकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांवर सुरू आहेत उपचार 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com