Gram Panchayat Results : मंगळवेढ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांतील नेत्यांचे वर्चस्व ! "स्वाभिमानी'ची एंट्री 

MagnalwedhaGP
MagnalwedhaGP

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्‍यातील 22 जागांसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील नेत्यांना आपल्या गावात वर्चस्व प्रस्थापित करता आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, पंचायत समिती सभापती प्रेरणा मासाळ, सदस्य रमेश भांजे यांनी आपल्या गावातील सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. 

186 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज शासकीय गोडाऊनमध्ये झाली. तहसीलदार स्वप्नील रावडे, नायब तहसीलदार सुधाकर मागाडे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मतमोजणी सुरू करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीचे निरीक्षक श्री. जोशी यांनी मतमोजणी दरम्यान केंद्राला भेट दिली. मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान बुरसे यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला. 

बालाजी नगर येथील मनीषा पवार व श्रीकांत चव्हाण यांना 159 मते पडल्यामुळे चिठ्ठीद्वारे श्रीकांत चव्हाण यांना विजयी घोषित करण्यात आले. मरवडे येथे सत्ताधारी गटाला विरोध करत स्थापन करण्यात आलेल्या गाव आघाडीने आठ जागांवर वर्चस्व प्रस्थापित करत ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली आहे. लवंगी ग्रामपंचायतीवर भालके गटाचे वर्चस्व कायम राहिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवले आहे. तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार हे डोणज ग्रामपंचायतमधून विजयी झाले आहेत. तर नंदेश्वर ग्रामपंचायतीवर माजी उपसभापती दादा गरंडे यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com