नंदीध्वज परंपरा कायम ठेवण्याचा मानकरी व नंदीध्वज धारकांचा निर्धार : श्री सिध्दरामेश्‍वर यात्रा 

nandidhwaj meeting.jpg
nandidhwaj meeting.jpg

सोलापूर, ः ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वर यात्रेच्या धार्मिक विधीअंतर्गत नंदीध्वजाची परंपरा धार्मिक विधीच्या वेळापत्रकानुसार कायम ठेवण्याचा निर्णय मानकरी, नंदीध्वजधारक व भक्तांच्या बैठकीत आज जाहीर करण्यात आला. 

यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या निवासस्थानी आज सकाळी यात्रेचे मानकरी व नंदीध्वजधारकासह सर्व भाविकांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये यात्रेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यात्रेच्या सर्व धार्मिक विधीला प्रशासनाने या पुर्वी परवानगी दिली आहे. पण केवळ नंदीध्वजाबाबत मागितलेल्या परवानगीबद्दल प्रशासनाने कोणताच निर्णय घेतला नाही. तसेच नंदीध्वज हा देखील धार्मिक विधीचा एक भाग आहे. त्यामुळे नंदीध्वजासह सर्वच धार्मिक परंपरा पाळल्या जाव्यात. 
परंपरेनुसार जेथे नंदीध्वज स्थापन केले जातात तेथूनच ते मंदिरात येतील असे जाहीर करताच उपस्थितांनी ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांचा जयघोष करत त्यास मान्यता दिली. 
यावेळी बैठकीसाठी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, प्रथमेश हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू, सुरज हिरेहब्बू, सुदेश देशमुख, राजु देशमुख, विजय देशमुख, सोमनाथ मेंगाणे, मल्लीनाथ मसरे, सुधीर थोबडे, संदेश भोगडे, योगनाथ कुर्ले, सुरेश म्हमाणे, सचिन भैरोपाटील, सोमनाथ सरडे, योगीनाथ म्हमाणे, अशोक वाले, गणेश मेंगाणे, जगु बिराजदार, राजू भैरोपाटील, बाबू भैरोपाटील, योगेश इटगे, बाळासाहेब मुस्तारे, राजू आमणगी, रेवणसिध्द आवजे, चंदू मेंडगे, कुमार शिरसी, भिमाशंकर म्हेत्रे, काशिनाथ म्हेत्रे, नागेश कुरलकर, निळा संगमेश्‍वर, जितू वेदपाठक, सुनील पंडित, मल्लिाकार्जून कुंभार, प्रदीप तडकळ, सुरेश म्हेत्रे, नागेश म्हेत्रे, योगीराज म्हेत्रे,मल्लीनाथ खुने, चिदानंद मुस्तारे, रेवणप्पा कुंभार, योगीराज म्हेत्रे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले की, प्रशासनाने नंदीध्वजाबाबत काही सुचना केल्या. त्यामध्ये नंदीध्वज मंदिरात उभारा असे सांगितले. पण प्रत्यक्षात ही धार्मिक परंपरा बदलता येत नाही. तसेच नंदीध्वज गाडीमध्ये घेऊन जावेत असे प्रशासनाचे म्हणणे होते. पण शहरातील खराब रस्त्यामुळे ते शक्‍य नाही. तसेच आधीच यात्रा कोरोना नियमामुळे लाखोतुन हजारो व आता केवळ शेकडोच्या उपस्थितीवर आली आहे. त्यामुळे नंदीध्वज परंपरेनुसार त्या भागातून काढले जातील व लोकांनी आपल्या घरातूनच त्याचे दर्शन घ्यावयाचे आहे. हा सर्व नंदीध्वजाचा विधी केवळ सहा ते सात तासात पूर्ण केला जाईल. पंचकमिटीने देखील मंदिरात आवश्‍यक ती यात्रेच्या विधीची तयारी केली आहे. दसरा, दिवाळी व नंतर बाजारात सर्वत्र गर्दी होती. यात्रेत केवळ धार्मिक होत असल्याने गर्दी होण्याचा प्रश्‍नच नाही. कोरोनाचा प्रार्दूभाव कमी होऊन लसीकरणाची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे यात्रेतील धार्मिक विधीबाबत अडचण नसल्याने त्यांनी सांगितले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com