एका जागेसाठीच महाविकास आघाडी व भाजपमध्ये सामना रंगण्याची शक्यता

Meeting today on the backdrop of Legislative Council elections
Meeting today on the backdrop of Legislative Council elections

सोलापूर : राज्यात कोरोना व्हायरसने एकीकडी धुमाकूळ घातला आहे तर त्याचवेळी दुसरीकडे विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे या निवडणूकीत भवितव्य ठरणार आहे. महाविकासआघाडीची याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. 5) सायंकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे.  यात बैठकीत विधानपरिषदेच्या जागा निवडून आणण्याबाबत रणनीती निश्चित होण्याची शक्यता आहे.
नऊ जागांसाठी २१ मेला मतदान होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता पाच जागा सहजपणे जिंकता येणार आहेत. मात्र, काँग्रेस सहाव्या जागेसाठी आग्रही असल्याने आघाडीकडून जोर लावला जाण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी असलेल्याने त्यांना प्रत्येकी दोन जागांची वाटणी होऊ शकते. यावरच बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपकडील संख्याबळ पाहता त्यांना तीन जागा सहज जिंकता येतील अशी शक्यता आहेत. मात्र, त्यांनी चौथ्या जागेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होणार आहे.

विधानपरिषदेच्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या तीन, राष्ट्रवादीच्या तीन, काँग्रेसच्या दोन आणि शिवसेनेची एक जागा आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकासआघाडीच्या पाच आणि भाजपच्या तीन जागा सहज निवडून येतील. भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादीकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडीचे तीन, समाजवादी पार्टीचे दोन, एमआयएमचे दोन, प्रहार जनशक्तीचे दोन, मनसे एक, माकप एक, शेतकरी कामगार पक्ष एक, स्वाभिमानी पक्ष एक, राष्ट्रीय समाज पक्ष एक, जनसुराज्य पक्ष एक, क्रांतिकारी शेतकरी पक्ष एक, व अपक्ष 13 अशी आमदारांची संख्या आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला पाच जागा सहज जिंकता येतील अशी चिन्हे आहेत. मात्र, अपक्षांना एकत्र करता आलं तर सहाव्या जागेवर  महाविकासआघाडी दावा करु शकेल. आघाडीचा हाच प्रयत्न असून सहा जागा लढवण्यासाठी काँग्रेसही आग्रही आहे. भाजपकडे असलेल्या संख्याबळानुसार भाजप तीन जागा सहज निवडून आणू शकणार असले तरी त्यांच्याकडूनही चौथ्या जागेसाठी प्रयत्न सुरु आहेत. भाजपला चौथी जागा जिंकण्यासाठी अपक्षांचीच जुळवाजुळव करावी लागणार आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.  21 मे रोजी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच निमार्ण झाल्याने निवडणूकीला परवानगी दिली आहे. निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अटी- शर्तींसह परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन निवडणूक घेण्याची सूचना आयोगाने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com