कोलांटउड्या मारणाऱ्या पुढाऱ्यांपेक्षा नागरिकांचा माझ्यावर अधिक विश्‍वास

MLA Bharat Bhalke statement regarding politics in Mangalvedha taluka
MLA Bharat Bhalke statement regarding politics in Mangalvedha taluka

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील नागरिकांना समस्येच्या वेदना माहीत आहेत. कोलांटउड्या मारणाऱ्या पुढाऱ्यांपेक्षा नागरिकांवर माझा अधिक विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार भारत भालके यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान बोलताना सांगितले.
पिढ्यानपिढ्या दुष्काळी दाहकतेचे चटके सोसणाऱ्या तालुक्यातील जनतेच्या समस्येचे राजकारण करण्यात अधिक वेळ गेल्यामुळे या समस्या सुटल्या नसल्यामुळे त्याची सोडवणूक माझ्या माध्यमातून होऊ शकते, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाल्यामुळे 2009 मध्ये केवळ जनतेच्या पाठबळावर आमदार झालो, असे भालके म्हणाले. त्यानंतर बहुचर्चित 35 गावांच्या पाणी प्रश्नासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहिलो. या भागातील भगीणीच्या डोक्यावरील हंडा कमी

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
करण्याच्या दृष्टीने भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबवली. त्यामुळे ऐन दुष्काळात जनतेला पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबवण्यात यशस्वी झालो. परंतु राज्यातील सत्ता बदलामुळे मंगळवेढा उपसासिंचन योजनेला जिथके अडथळे आणता येईल तितके मागील भाजप सरकारने आणले. परंतु जनतेनी मला विधानसभेत पाठवल्यामुळे सहा महिने ते अडथळे दूर करण्यात माझा अधिक वेळ गेला. त्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे बैठक लावावी लागली. जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मी बांधील असल्यामुळे उर्वरित कालावधीमध्ये त्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी जनतेला दिलेल्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी बांधील आहे. दरम्यान काही पुढारी त्यांच्या स्वार्थासाठी माझ्याकडे येवून फायदा घेऊन विरोध करणाऱ्या तालुक्यातील पुढार्‍यांचा देखील त्यांनी खरपूस समाचार घेत केवळ जनता पाठींशी आहे. म्हणून मी त्यांचा आमदार आहे. त्यामुळे यापुढील काळातही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच बांधील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com