पदवीधरांच्या समस्यांकडे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे दुर्लक्ष : आमदार रोहित पवार 

rohit new.jpg
rohit new.jpg

मोहोळ(सोलापूर): पदवीधरांच्या प्रश्नाची तसेच समस्यांची सोडवणुक करण्याऐवजी पदवीधरांनी केलेले आमदार चंद्रकांत दादा पाटील फक्त विविध विषयावर वक्तव्य करण्यातच जास्त व्यस्त असतात. ज्या मतदारांनी आपल्याला निवडुन दिले अशा मतदारांचे प्रश्न व समस्या सोडविण्यास प्रामुख्याने प्राधान्य देत आपण संबधिताचे प्रतिनिधी आहोत यांची जाणीव ठेवली पाहीजे, असे सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड व जयंत आसेगांवकर यांना पसंती क्रमांक एकचे मत टाकू न विजयी करा असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले. 


पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरूण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसेगांवकर यांच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यानिमीत्त मोहोळ नागरी पतसंस्थेच्या प्रांगणात उपस्थित पदवीधर तसेच शिक्षक संघटनेच्या मतदारांना मार्गदर्शन करताना आमदार रोहित पवार बोलत होते. 

यावेळी माजी आमदार राजन पाटील यांनी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना तालुक्‍यातीतुन जास्तीत जास्त मताधिक्‍य देण्याची परंपरा यावेळीही कायम राखू असा आत्मविश्वास बोलुन दाखविला. या प्रसंगी लोकनेते शुगरचे चेअरमन विक्रांत पाटील यांनी प्रास्ताविकात माध्यमातुन महाविकास आघाडीची भुमिका सांगितली. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍यराणा पाटील, शरद लाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अशोक भोसले, राष्ट्रीय कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, कौशीक गायकवाड, निरंजन भूमकर, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, सुभाष गुळवे, रमेश बारसकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पप्पू पाटील, सभापती रत्नमाला पोतदार, उपनगराध्यक्ष शौकत तलफदार यांच्यासह यशोदा कांबळे, मार्केट कमेटीचे सभापती असलम चौधरी, नागेश साठे, दिपक माळी, प्रशांत बचुटे, सुदर्शन कादे, शहाजान शेख, कुंदन धोत्रे, प्रमोद डोके, राहुल मोरे, हेमंत गरड, नागेश बिराजदार, जालिंधर लांडे, दत्ता पवार, राजाभाऊ गुंड, धनाजी गावडे, मुश्‍ताक शेख, संतोष सुरवसे, संतोष वायचळ यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर प्रमुख पदाधिकारी व पदवीधर शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जि प.सदस्य विक्रांत पाटील यांनी तर सुत्रसंचालन सत्यवान दाढे यांनी केले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com