अहिल्यादेवींच्या स्मारकाचा आमदार रोहित पवारांनी घेतला आढावा 

logo
logo

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा उभारणार असून गुरुवारी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी विद्यापीठास भेट देऊन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडून यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुतळा उभारण्याच्या जागेची पाहणी करून यासाठी आवश्‍यक ती मदत करणार असल्याचे सांगितले.

यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी आमदार पवार यांना अहिल्यादेवी यांचा पुतळा व अध्यासन केंद्राबाबत सर्व माहिती दिली. यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. अध्यासन केंद्राची निर्मिती होणार आहे. अहिल्यादेवी यांच्यासारख्या एका मोठ्या व्यक्तीच्या पर्वालाच ही सुरुवात होत आहे आणि संपूर्ण समाजासाठी हि एक भूषणावह बाब राहील. यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून जागा निश्‍चित झाली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असेही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी आमदार संजयमामा शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, क्रीडा संचालक सुरेश पवार, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, मोहोळचे शिवसेना युवा नेते सोमेश क्षीरसागर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास कदम, प्रशांत बाबर, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com