विठ्ठल मंदिर उघडल्यानंतर मनसेचा आनंदोत्सव !

MNS
MNS

पंढरपूर (सोलापूर) : मागील आठ महिन्यांपासून भाविकांना दर्शनासाठी बंद असलेले येथील विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर खुले केले आहे. मंदिर दर्शनासाठी खुले केल्यानंतर मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून मंदिर परिसरात आनंदोत्सव साजरा केला. 

राज्यातील धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली करावीत, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे वारंवार केली होती. पंढरपूर येथील विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरही दर्शनासाठी खुले करावे यासाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्यासमवेत येथील महाराज मंडळींनी नुकतीच राज ठाकरे यांची मुंबईतील त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या वेळी दोन ते तीन दिवसांत मंदिर उघडण्यास सरकारला भाग पाडू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी महाराज मंडळींना दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील धार्मिक स्थळे दिवाळी पाडव्यापासून खुली केली आहेत. 

मनसेने मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याची भावना व्यक्त करत येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरीजवळ आज सकाळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना लाडू, पेढे वाटप करून व फटाके फोडून जल्लोष साजरा केला. या वेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने भाविकांना मास्क आणि सॅनिटायझरचे मोफत वाटपही करण्यात आले. 

या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांनी मंदिर उघडण्यासाठी पाठपुरावा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसा निर्णय घेण्यास भाग पडल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मंदिर उघडल्याचा आनंदोत्सव साजरा केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com