सोलापुरातील नागरिकांच्या तपासणीसाठी  मोबाईल क्‍लिनीक (VIDEO)

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 25 मे 2020

सोलापूर शहरातील विविध भागांमधील नागरिकांची आरोग्य तपासणी या मोबाईल क्‍लिनीकच्या माध्यमातून करण्यात येईल, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. 

सोलापूर : महापालिका व परिवहन उपक्रमाच्या वतीने परिवहन उपक्रमातील एका बसमध्ये मोबाईल क्‍लिनीक सुरु करण्यात आले आहे.

शहराच्या विविध भागातील नागरिकांच्या तपासणीसाठी या क्‍लिनीकचा वापर होणार आहे. आयुक्त दीपक तावरे यांनी आज या क्‍लिनीकची पाहणी केली. यावेळी परिवहन समितीचे सभापती परिवहन सभापती जय साळुंखे, नगरअभियंता संदीप कारंजे, आरोग्य अधिकारी संतोष नवले उपस्थित होते. येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहरातील विविध भागांमधील नागरिकांची आरोग्य तपासणी या मोबाईल क्‍लिनीकच्या माध्यमातून करण्यात येईल, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, लोकं उभी आहेत आणि बाहेरील
महापालिकेने सुरु केलेल्या मोबाईल क्लिनिकसोबत आयुक्त दीपक तावरे, परिवहन सभापती जय साळुंखे, नगरअभियंता संदीप कारंजे, आरोग्य अधिकारी संतोष नवले.  

मास्क न लावलेल्या 18 जणांना दंड 
मास्क न लावलेल्या 18 जणांना सोमवारी प्रत्येकी 100 रुपये दंड करण्यात आला. त्यांच्याकडून एकूण एक हजार 800 रुपये वसूल करण्यात आले. सोलापूर शहरात करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त दीपक तावरे यांनी शहरातील किराणा दुकानदार, चार चाकी गाडी असलेले भाजी विक्रेते व गर्दी होणाऱ्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी मास्क व ग्लोज घालण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मास्क न लावलेल्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, लोकं उभी आहेत, झाड, बूट आणि बाहेरील
साधू वासवानी उद्यानात (गुरुनानक चौक) येथे फिवर क्‍लिनीक ओपीडीच्या जागेची पाहणी करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे व इतर.

साधु वास्वानी उद्यानात फिवर ओपीडी 
कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाधित क्षेत्रातील जेष्ठ नागरिकांना साठी साधू वासवानी उद्यानात (गुरुनानक चौक) येथे फिवर क्‍लिनीक ओपीडी सुरु करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी या जागेची पाहणी केली. विभागीय कार्यालय क्रमांक आठच्या कार्यक्षेत्राततील बापूजीनगर, शास्त्री नगर,आंबेडकर नगर,शिक्षक सोसायटी,कुर्बान हुसेन नगर,भारत रत्न इंदिरा नगर,तकशील नगर,केशव नगर झोपडपट्टी ,कुंभार गल्ली,लोधी गल्ली,कामठी पुरा,या भागातील जास्त रुग्ण असून त्या भागातील जेष्ठ नागरिकांची या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, प्लस ऑक्‍सिमीटर द्वारें तपासणी करण्यात येणार आहे. सर्दी,खोकला,ताप,उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार असून त्यामध्ये ताप, सर्दी व खोकला हे तसे नेहमीचे आजार आहेत. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींची तपासणी व उपचार करण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.यावेळी नागरिकांना मल्टी व्हिटॅमिन गोळ्या व 4 मास्क मोफत देण्यात येणार आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. 

महापालिकेने केल्या दहा रुग्णवाहिकांची सोय 
शहरात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढू लागल्याने महापालिकेने दहा रुग्णवाहिकांची सोय केली आहे. महापालिकेच्या आठ विभागीय कार्यालयात प्रत्येकी एक रुग्णवाहिका असणार आहे. याशिवाय महापालिकेच्या संसर्गजन्य उपचार केंद्रात (आयडी हॉस्पिटल) येथे दोन रुग्णवाहिका अतिरीक्त असणार आहेत. रुग्णवाहिका उपलब्ध करून घेण्यासाठी नागरिकांनी 0217-2323700 या क्रमांकावर संपर्क साधावा. विभागीय कार्यालयानुसार रुग्णवाहिका व चालक याप्रमाणे ः झोन एक ः सिद्धेश्‍वर आळुरे (9960446015), झोन दोन ः काकंडीकर (9595114024), झोन तीन ः अफसर शेख (9370251725), झोन चार ः श्री. परबाळकर (9067200481), झोन पाच ः पिंटू पाटोळे (9011319948), झोन सहा ः महेश यामजले (8263833855), झोन सात ः मुकेश उकरंडे (9921743538) आणि झोन आठ ः लादेन शेख (9371802338). 

सोलापुरातील नागरिकांसाठी  मोबाईल क्‍लिनीक (VIDEO)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile clinic for screening of citizens in Solapur