मोहोळ पंचायत समितीचा दणका : लेट लतिफांना कारणे दाखवा नोटीस 

राजकुमार शहा 
Thursday, 26 November 2020

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी सायंकाळी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. सायंकाळी आढावा बैठक होणार म्हणून महसूल व जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी पंढरपुरला रवाना झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी पहाटे श्री विठ्ठलाची महापूजा झाली. ते रवाना झाल्यानंतर सर्व अधिकारी सोलापुरातील मुख्यालयाकडे परत निघाले. येता येता सीईओ स्वामी यांनी आपली गाडी मोहोळ पंचायत समितीकडे वळविली. 

मोहोळ (सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी सकाळी दहा वाजता अचानकपणे मोहोळ पंचायत समितीला भेट दिली. यावेळी कार्यालयात बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी उपस्थित होते. हे चित्र पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. कार्यालयात उशिरा आलेल्या पाच कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

हेही वाचाः सोलापूर शहरात 1120 चाचण्यांमध्ये आढळले 30 नवे कोरोनाबाधित 

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी सायंकाळी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. सायंकाळी आढावा बैठक होणार म्हणून महसूल व जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी पंढरपुरला रवाना झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी पहाटे श्री विठ्ठलाची महापूजा झाली. ते रवाना झाल्यानंतर सर्व अधिकारी सोलापुरातील मुख्यालयाकडे परत निघाले. येता येता सीईओ स्वामी यांनी आपली गाडी मोहोळ पंचायत समितीकडे वळविली. 

हेही वाचाः सांगोल्यातील अतिवृष्टीग्रस्त 45 हजार 716 शेतकऱ्यांच्या खात्यावर 28.62 कोटींची मदत 

दरम्यान कार्यालय सुरू होण्याची वेळ उलटून अर्धा तास झाला तरीही कार्यालयातील सर्व खुर्च्या रिकाम्या असल्याचे त्यांना दिसून आले. कर्मचाऱ्यांच्या या शिस्तीबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. पंचायत समिती कार्यालयात सीईओ आल्याची माहिती मिळताच अधिकारी व कर्मचारी धावतपळत आले. उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून दखल घेण्याची सूचना देऊन स्वामी सोलापूरला रवाना झाले. सीईओंच्या अचानक भेटीने कर्मचाऱ्याची पाचावर धारण बसली. आता उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय होणार? याबाबत जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 
दरम्यान, गटविकास अधिकारी गणेश मोरे हे तातडीने कार्यालयात आले. त्यांना स्वच्छता व रेकॉर्ड सॉर्टींग बाबत तसेच नागरिकांची कामे वेळेत करण्याच्या सुचना सोईओ स्वामी यांनी दिल्या. दरम्यान जे कर्मचारी कार्यालयात उपस्थित नव्हते अशा पाच जणांना कारणे दाखवा नोटिसा दिल्याचे गटविकास अधिकारी मोरे यांनी सांगितले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohol Panchayat Samiti's hit: Show cause notice to late Latif