सोलापूर रेल्वे स्थानकास श्री सिद्धरामेश्वरांचे नाव द्या : खा. जयसिद्धेश्वर महास्वामींनी मांडले संसदीय अधिवेशनात विविध प्रश्‍न 

तात्या लांडगे
Wednesday, 23 September 2020

श्री सिद्धेश्‍वर महाराज हे बाराव्या शतकातील थोर संत होऊन गेले, ज्यांनी 68 हजार वचने लिहिली व जिवंत समाधी घेतली, ज्यास शिवयोग समाधी असेही म्हणतात. त्यामुळे सोलापूर रेल्वे स्थानकास श्री सिद्धरामेश्वर रेल्वे स्थानक असे नामकरण करावे. तसेच मराठा बांधवांना आरक्षण द्यावे व सोलापूर जिल्ह्यात सांस्कृतिक पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्याबाबतची मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी संसदीय अधिवेशनात केली. 

सोलापूर : सोलापूर ही ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची नगरी, पुण्यभूमी म्हणून ओळखली जाते. श्री सिद्धेश्‍वर महाराज हे बाराव्या शतकातील थोर संत होऊन गेले, ज्यांनी 68 हजार वचने लिहिली व जिवंत समाधी घेतली, ज्यास शिवयोग समाधी असेही म्हणतात. त्यामुळे सोलापूर रेल्वे स्थानकास श्री सिद्धरामेश्वर रेल्वे स्थानक असे नामकरण करावे. तसेच मराठा बांधवांना आरक्षण द्यावे व सोलापूर जिल्ह्यात सांस्कृतिक पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्याबाबतची मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी संसदीय अधिवेशनात केली. 

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज हे बाराव्या शतकातील थोर संत, साहित्यिक होते, ज्यांनी तब्बल 68 हजार वचने लिहिली. त्यांनी सामुदायिक विवाहाची सुरवात केली. सोलापूर पुण्यभूमीचा, येथील नागरिकांचा विचार करून 40 एकरात भव्य तलावाची निर्मिती केली. याच तलावाच्या मधोमध अमृतसर येथील सुवर्ण मंदिरासारखे भव्य सुंदर मंदिर सुशोभित आहे. गेल्या आठ शतकांपासून प्रतिवर्षी येथे 12 ते 16 जानेवारी दरम्यान भव्य यात्रा भरते. यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून 10 लाखांहून अधिक भाविक सहभागी होतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना विनंती करत सोलापूर रेल्वे स्थानकाचे नामांतरण करण्याची मागणी करण्याबाबत प्रश्न खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी उपस्थित केला. 

मराठा बांधवांना आरक्षण मिळावे 
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळण्याची मागणी असून, सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबतही खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी मागणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Jayasiddheshwar Mahaswamy raised various questions in the Parliamentary session