Helicopter
Helicopter

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हेलिकॉप्टर ! खासदार नाईक-निंबाळकरांनी केली व्यवस्था 

करमाळा (सोलापूर) :  करमाळा तालुक्‍यात नरभक्षक बिबट्याने तीन जणांचे बुळी घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत हेलिपॅडची व्यवस्था करण्याच्या मागणीचे निवेदन करमाळा भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी तहसीलदार समीर माने यांना दिले आहे. 

पंधरा दिवस झाले करमाळा तालुक्‍यात नरभक्षक बिबट्याने दहशत माजवली आहे. सध्या तो बिबट्या वांगी, सांगवी, ढोकरी, चिखलठाण, शेटफळ, उंदरगाव या भागातील ऊस व केळीच्या शेतात फिरत आहे. उसाची व केळीची दडण असल्याने वन विभागातील अधिकारी व शार्प शूटर यांना बिबट्यास जेरबंद तथा निशाणा साधण्यास कठीण जात आहे. ही परस्थिती पाहता माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी हेलिकॉप्टरची तातडीने व्यवस्था केली आहे. या वेळी तालुका सरचिटणीस सुहास घोलप, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे, मनोज मुसळे आदी उपस्थित होते. 

याबाबत माहिती देताना भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे म्हणाले, करमाळा तालुक्‍यात बिबट्याने तीन बळी घेतले आहेत. 1 डिसेंबरपासून तालुक्‍यात बिबट्या फिरत आहे. वन विभागाने शार्प शूटर व इतर फौजफाटा उभारूनही अद्याप वन विभागला बिबट्यास जेरबंद करता आले नाही किंवा मारता आले नाही. मागील आठवड्यात खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबातील व्यक्तींची भेट घेतली. या वेळी त्यांनी बिबट्यास मारण्यासाठी हेलिकॉप्टर देण्याची तयारी दर्शवली होती. 15 दिवस झाले तरी बिबट्या सापडत नसेल्याने खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यानी स्वखर्चाने हेलिकॉप्टर देण्याची व्यवस्था केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com