महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यात महावितरणचे साडेतीन कोटींचे नुकसान 

महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यात महावितरणचे साडेतीन कोटींचे नुकसान 

सोलापूर ः जिल्ह्यात निर्माम झालेल्या पूर परिस्थितीचा महावितरणने नेटाने सामना केल्यामुळे जिल्ह्यातील वीजयंत्रणा पूर्व पदावर आली आहे. बाधित झालेल्या 325 गावांपैकी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील एकमेव संजवाड गाव बंद आहे. पाणी ओसरताच या गावचा वीजपुरवठाही पूर्ववत करण्यास महावितरण सज्ज आहे. आतापर्यंत एक लाख 50 हजार 582 पैकी एक लाख 16 हजार 205 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. जिल्ह्यात महापुरामुळे महावितरणचे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

परतीच्या पावसामुळे राज्यात सर्वाधिक नुकसान सोलापूरचे झाले आहे. उजनी धरणातून विसर्ग वाढल्यामुळे व सर्वच नदी-नाले दुथडी भरुन वाहिल्याने जिल्ह्यातील 51 वीज उपकेंद्रे बाधित झाली होती. यामध्ये दोन ठिकाणी अतिउच्चदाबाचे मनोरे कोसळल्याने 12 वीज उपकेंद्रे बंद पडली. परंतु, दिवसभरात पर्यायी मार्गाने ती सुरु करण्यात आली. बाधित झालेल्या गावांची संख्या 325 पर्यंत गेली होती. पाणी ओसरताच टप्प्या-टप्प्याने 324 गावांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील संजवाड नदी पल्याड असल्याने त्या गावाला पर्यायी मार्गाने चालू करणे अद्याप शक्‍य झाले नाही. मात्र, पाणी कमी होताच या गावाचा वीजपुरवठाही सुरु होईल. या गावात घरगुतीचे 300 ग्राहक बंद आहेत. 

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता, संचालक (संचालन) सतीश चव्हाण, प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन लागणारे खांब, ऑईल व इतर साहित्याची व्यवस्था केली आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यात एक हजार 882 विजेचे खांब कोसळले आहेत. आठ हजार 707 रोहित्रे बाधित झाली आहेत. ही सर्व रोहित्रे सुरु करण्यासाठी लागणारे ऑईल मुख्यालयाने पुरेशा प्रमाणात दिले आहे. आतापर्यंत पाच हजार 448 रोहित्रे सुरु केली आहेत. 


 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com