सामाजिक समतेचा संदेश : मुस्लिम तरुणाची स्वच्छतेतून विठ्ठलभक्ती

Pandharpur
Pandharpur

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहर आणि तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर 17 मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद केले आहे. दर्शन बंद असले तरी देवाचे नित्योपचार नियमित सुरू आहेत. विठ्ठल मंदिरातील पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. मंदिर समितीकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी येथील मुजम्मील कमलीवाले या मुस्लिम तरुणाने विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर परिसरात स्वत: पंपाद्वारे सॅनिटायझरची फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण केली आपली विठ्ठलभक्ती दाखवून दिली. 

येथील मुजम्मील कमलीवाले या मुस्लिम तरुणाने श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर परिसरात स्वत: पंपाद्वारे सॅनिटायझरची फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण केला. मस्लिम तरुणाच्या या विठ्ठलभक्तीचे वारकरी संप्रदायामधून कौतुक केले जात आहे. पंढरपूर शहर आणि तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर 17 मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद केले आहे. दर्शन बंद असले तरी देवाचे नित्योपचार नियमित सुरू आहेत. विठ्ठल मंदिरातील पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. मंदिर समितीकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी येथील मुजम्मील कमलीवाले या मुस्लिम तरुणाने विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर परिसरात स्वत: पंपाद्वारे सॅनिटायझरची फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण केला आहे. 

पंढरपूर शहरात मुस्लिम समाज बहुसंख्येने आहे. सामाजिक समतेची भावना दोन्ही समाजाकडून वृद्धिंगत केली जाते. येथील अनेक सण हिंदू-मुस्लिम समाजबांधव एकत्रितपणे साजरे करतात. सामाजिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या मुजम्मील कमलीवाले या तरुणाने एक पाऊल पुढे टाकत चक्क लाखो भाविक-भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलचरणी स्वच्छतेची सेवा अपर्ण केली आहे. मुजम्मील कमलीवाले हा तरुण गेल्या चार महिन्यांपासून शहरात कोरोना वॉरिअर्स म्हणून काम करत आहे. उच्चशिक्षित असूनही तो सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून आला आहे. त्याने सॅनिटायझर, मास्क, अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे मोफत वाटप केले आहे. गरीब व मजुरांना अन्नदान करून आपले दातृत्व देखील सिद्ध करून दाखवले आहे. 

सध्या विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मंदिरातील कर्मचारी व पुजारी यांचे आरोग्य चांगले राहावे याबरोबरच मंदिरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी या तरुणाने पाठीवर पंप अडकवून मंदिर व परिसरात सॅनिटायझरची फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण केला. त्याच्या या आगळ्यावेगळ्या विठ्ठलभक्तीचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनीही कौतुक केले आहे. मुजम्मील कमलीवाले याने विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराबरोबरच शहरातील मशीद आणि बुद्ध विहारातही फवारणी करून सामाजिक समतेबरोबरच स्वच्छतेचाही संदेश दिला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com