लोकप्रतिनिधीच 'मटका'बहाद्दर असतील तर जनतेने काय अपेक्षा बाळगावी? राष्ट्रवादी कामगार सेलचा सवाल 

श्‍याम जोशी 
Friday, 28 August 2020

राष्ट्रवादी कामगार सेलचे डॉ. गोवर्धन सुंचू म्हणाले, कामगार वर्ग असलेल्या पूर्व भागात मटका अड्डाचालकांनी कामगारांना जास्त पैसे मिळण्याचे आमिष दाखवल्याने कामगारांसह या भागातील अशिक्षित नागरिक त्याच्या आहारी गेले आहेत. आठवड्याचा पगार मटका खेळण्यामध्ये घालवत आहेत. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. लोकप्रतिनिधीच मटकाबहाद्दर असतील तर त्यांच्याकडून जनतेने काय अपेक्षा बाळगावी? मटका व्यावसायिकांच्या पाठीशी बडे नेते देखील आहेत. 

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : शहरात अनेक ठिकाणी मटका अड्डे सुरू आहेत. त्याचे प्रमाण पूर्व भागात जास्त आहे. या मटका बहाद्दरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

हेही वाचा : ग्रामीण पोलिसांचा वाळू माफियांना दणका! केला 29 लाखांचा मुद्देमाल जप्त 

राष्ट्रवादी कामगार सेलचे डॉ. गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तसेच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तातडीने 40 जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याबद्दल राष्ट्रवादी कामगार सेलतर्फे त्यांचे अभिनंदनही करण्यात आले. या गुन्हेगारांवर जुगार प्रतिबंधक कायदा लावून चालणार नाही तर त्यांच्यावर मोक्का (संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कारवाई होणे आवश्‍यक असल्याचे कामगार सेलने निवेदनात म्हटले आहे. 

हेही वाचा : सरकोली येथे दोन गटांत मारामारी; 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

कामगार वर्ग असलेल्या पूर्व भागात मटका अड्डाचालकांनी कामगारांना जास्त पैसे मिळण्याचे आमिष दाखवल्याने कामगारांसह या भागातील अशिक्षित नागरिक त्याच्या आहारी गेले आहेत. आठवड्याचा पगार मटका खेळण्यामध्ये घालवत आहेत. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. लोकप्रतिनिधीच मटका बहाद्दर असतील तर त्यांच्याकडून जनतेने काय अपेक्षा बाळगावी? मटका व्यावसायिकांच्या पाठीशी बडे नेते देखील आहेत. ते त्यांना पाठीशी घालत आहेत. तसेच पोलिस दलात काम करणारेही या व्यवसायात भागीदार आहेत. म्हणजेच मटका व्यवसाय संघटित गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. म्हणून त्यांच्यावर त्वरित मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच पूर्व भागातील सर्व मटका अड्डे त्वरित बंद करण्यात यावेत; अन्यथा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

या वेळी डॉ. सुंचू यांच्यासमवेत श्रीनिवास कोडम, सतीश दासरी, बालाजी बुधारम, अंबादास देविदास, सतीश गोरंटला, तिम्मप्पा मादगुंडी आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalist Workers Cell demands action against Matka gamblers under Mocca Act