युवासेनेची जाहीर होणार नवी कार्यकारणी ! युवासेनेचे संपर्कप्रमुख पिंगळे आज सोलापुरात

तात्या लांडगे
Wednesday, 16 December 2020

ठळक बाबी...

 • बुथ तिथे यूथ आणि महाविद्यालयनिहाय युवासेनेची असणार कार्यकारणी
 • युवासेनेची आता गाव तिथे शाखा; युवासेना सुरु करणार नवी हेल्पलाईन
 • पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसाठी आयोजित केले जाणार रोजगार मेळावे
 • शहर उत्तर, शहर मध्य व दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट मतदारसंघातील कार्यकारणी होणार आज जाहीर

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्हा युवासेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक गुरुवारी (ता. 17) सकाळी 11 वाजता शिवस्मारक सभागृह येथे होणार आहे. या बैठकीला युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम आणि राज्य विस्तारक तथा सोलापूर संपर्क प्रमुख विपुल पिंगळे मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर आणि शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर उपस्थित राहणार असल्याची माहिती युवासेनेचे शहर युवा अधिकारी विठ्ठल वानकर आणि जिल्हा युवा अधिकारी मनीष काळजे यांनी दिली.

ठळक बाबी...

 • बुथ तिथे यूथ आणि महाविद्यालयनिहाय युवासेनेची असणार कार्यकारणी
 • युवासेनेची आता गाव तिथे शाखा; युवासेना सुरु करणार नवी हेल्पलाईन
 • पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसाठी आयोजित केले जाणार रोजगार मेळावे
 • शहर उत्तर, शहर मध्य व दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट मतदारसंघातील कार्यकारणी होणार आज जाहीर

 

सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या चार विधानसभा मतदारसंघाची जम्बो कार्यकारिणी यावेळी जाहीर होणार आहे. प्रत्येक विधानसभानिहाय उपजिल्हा युवा अधिकारी, उपशहरप्रमुख, शहर चिटणीस, प्रभागनिहाय शाखा प्रमुख तसेच ग्रामीणसाठी तालुका व उप-तालुकाप्रमुख यांची निवड करण्यात येणार आहे. याशिवाय आगामी महानगपालिका, ग्रामपंचायत तसेच नगरपालिका निवडणूक यासह बूथ तेथे युथ, महाविद्यालयात युवासेना युनिट स्थापन करणे, युवासेनेची गाव तेथे शाखा, युवकांसाठी रोजगार मेळावे, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी शिबिरे आयोजित करणे, युवासेना हेल्पलाईन तयार करणे, नवीन मतदार नोंदणी शिबीर आदी विषयांवर चर्चा होणार आहे, असेही युवासेनेचे शहर युवा अधिकारी विठ्ठल वानकर आणि जिल्हा युवा अधिकारी मनीष काळजे यांनी सांगितले.
 


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: New executive of Yuvasena to be announced! Yuva Sena liaison chief Pingale in Solapur today