दूध संघाच्या निवडणुकीत नवीन डोकेदुखी 

milk logo
milk logo

सोलापूर : पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ, पुणे जिल्हा दूध संघ आणि सोलापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक तोंडावर आली आहे. या संघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली असून क्रियाशील सभासद आणि क्रियाशील सभासद हा मुद्दा दूध संस्था आणि संघासाठी अडचणीचा ठरण्याची शक्‍यता आहे. 
हेही वाचा - थकीत ऊसबिलासाठी सोलापूरच्या स्वाभिमानीचे आंदोलन 
97 व्या घटना दुरुस्तीनंतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी क्रियाशील सभासद आणि क्रियाशील सभासद हा निकष लावण्यात आला आहे. या दुरुस्तीनंतर दूध संघाची पहिलीच निवडणूक होत असल्याने अनेक संस्था निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत 60 च्या दरम्यान संस्थांना स्थान मिळाले आहे. सभासद संस्थांचे ठराव घेण्याचे काम सध्या सुरू आहे. क्रियाशील व क्रियाशील मुद्यावर काही संस्थांनी पुण्याच्या सहनिबंधकांकडे धाव घेतली आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीपूर्वी हा मुद्दा येत्या काळात अधिक चर्चेला येण्याची शक्‍यता आहे. 
हेही वाचा - स्वामी समर्थ कारखाना व बॅंकेबाबत काय केली मागणी 
काय घडू शकते? 
क्रियाशील व क्रियाशील निकष आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने तांत्रिक मुद्यावर जिल्हा दूध संघाच्या काही संस्थांना मतदानाचा अधिकार मिळू शकतो. निवडणूक लढविण्यासाठी कोणत्या संस्था पात्र ठरणार याबाबत देखील कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ही सर्व प्रक्रिया येत्या काळात होणार असल्याने सोलापूरच्या राजकारणात येत्या काळात काय काय घडतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com