शहरातील मालमत्तांचे निश्‍चित झाले नवे मूल्यांकन ! आचारसंहितेनंतर दर होणार जाहीर 

41money_children_20_20Copy_0 - Copy.jpg
41money_children_20_20Copy_0 - Copy.jpg

सोलापूर : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून राज्य सरकारने 13 सप्टेंबरला नवा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेने बांधकामाचा कालावधी, मालमत्तेच्या क्षेत्रफळानुसार रेडिरेकनर दराप्रमाणे नवे मूल्यांकन निश्‍चित केले आहे. त्यावर आचारसंहितेनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे अंतिम निर्णय घेणार आहेत. महापालिकेने तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे.

गाळे भाडे अन्‌ खरेदी- विक्रीचे वाढणार मूल्यांकन 
शहरात मेजर शॉपिंग सेंटरच्या 25 इमारतीत 590 गाळे आहेत. तर 'बीओटी' तत्त्वावरील 166 गाळे असून मिनी शॉपिंग सेंटरमध्ये 653 गाळे आहेत. दुसरीकडे 375 खुल्या जागा असून 325 जागांची मुदत संपली आहे. शहरात 156 समाज मंदिरे असून ती भाडे तत्त्वावर देण्यात आली आहेत. 57 समाज मंदिरांची मुदत संपली असून 52 पैकी 32 अभ्यासिकांचीही मुदत संपली आहे. आता भाडे कराराची मुदत संपलेल्या मालमत्ता नव्याने भाडे तत्त्वावर दिल्या जातील. तर नव्या रेडिरेकनर दराप्रमाणे गाळेधारकांना वाढीव भाडे द्यावे लागणार आहे. तर खासगी मालमत्ता विक्री, खरेदीसाठीही नव्या मूल्यांकनानुसार ज्यादा पैसे मोजावे लागतील, असेही महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासंबंधीचा निर्णय पदवीधर व शिक्षक आमदारकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हाधिकारी घेतील, असेही सांगण्यात आले. 

नव्या रेडिरेकनर दराप्रमाणे गाळेधारकांना भाडे देणे बंधनकारक असणार आहे. शहरातील मालमत्तांचे नवे मूल्यांकन निश्‍चित करण्यासाठी 9 नोव्हेंबरला होणारी नियोजित बैठक आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आता 10 डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी बैठक घेऊन त्यावर तोडगा काढणार आहेत. दरम्यान, 13 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार शहरातील एक हजार 227 गाळेधारकांना महापालिकेने नव्या परिपत्रकानुसार भाडे भरा, अशी नोटीस बजावली आहे. दरम्यान, गाळेधारकांनी त्याला विरोध दर्शविला आहे. मात्र, महापालिका नव्या रेडिरेकनर दराप्रमाणे भाडे द्यावेच लागेल, या भूमिकेवर ठाम आहे. दरम्यान, शहर व हद्दवाढ भागासाठी वेगवेगळे दर असणार आहेत. जागा तथा मालमत्तांची खरेदी- विक्री करताना नव्या रेडिरेकनर दराचा विचार केला जाणार असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांची बैठक झाल्यानंतर मूल्यांकन व रेडिरेकनरचे सुधारित दर जाहीर केले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com