नववीत शिकणाऱ्या मुलीला पळविले ! तुळजापूर रोडवरील कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा

0Crime_Story_0.jpg
0Crime_Story_0.jpg

सोलापूर : इयत्ता नववीत शिकत असलेल्या तरुणीला कोणीतरी अमिष दाखवून पळविल्या घटना सोलापुरात घडली आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलगी आणि तिची मैत्रीण या दोघीजणी त्यांच्या राहत्या घरी बसल्या बोलत होत्या. त्यावेळी पीडित मुलीची आई आत्यांकडे जाऊन येते म्हणून घरातून बाहेर पडल्या. काहीवेळाने त्या घरी आल्या, मात्र त्यांना घरात मुलगी दिसलीच नाही. तरुणीच्या आईने नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, त्यांच्याही घरी तरुणी नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर तरुणीच्या आईने पोलिस ठाणे गाठले आणि मुलीला कोणीतरी पळवून नेल्याची फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. शेख हे करीत आहेत.

कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा
सोलापूर : सोलापूर- तुळजापूर रोडवरील हॉटेल विराजमध्ये वेश्‍या व्यवसाय चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अैनतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिस व सोलापूर ग्रामीण तालुका पोलिसांनी संयुक्‍तपणे छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी हॉटेलमधील महिलांची सुटका केली. तर नितीन बाबूराव ढोणे, महेश रमेश थिटे (रा. पिरटाकळी, ता. मोहोळ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. महिलांच्या इच्छेविरुध्द त्यांना वेश्‍या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांची शारीरिक पिळवणूक केली. त्यांच्या कमाईवर स्वत:चा उदरनिर्वाह भागविल्याचेही पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

रिक्षा प्रवासादरम्यान चोरी
सोलापूर : रिक्षातून प्रवास करताना महिलेच्या पर्समधून दोन महिलांनी रोकड लंपास केली आहे. एसटी स्टॅंडसमोरील कारंबा रिक्षा स्टॉपजवळ ही घटना घडली असून विजयलाक्ष्मी बाळू मस्के (रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीसांत दोन महिलांविरुध्द फिर्याद दिली आहे. एसटी स्टॅंडसमोरील कारंबा रिक्षा स्टॉप येथून मस्के या त्यांच्या गावी निघाल्या होत्या. प्रवास करताना त्यांच्या पर्समधून तीन हजार रुपये त्यांनी लंपास केल्याचेही मस्के यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. काळे हे करीत आहेत.

जनावरांची वाहतूकप्रकरणी दोघांवर गुन्हा
सोलापूर : विनापरवाना जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी बाबुलाल अब्बासअली शेख (रा. न्यू बुधवार पेठ, मसरे वस्ती) व अमिनसाब हुसेनसाहब शेख (रा. होसापते, ता.बदमी, जि. बागलकोट) यांच्याविरुध्द जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ते दोघेही चारचाकी वाहनातून शहरी भागात विनापरवाना जनावरे ने- आण करत होते. तसेच त्या जनावरांना चारा, पाण्याविना ठेवले. कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक केल्याचाही गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. त्यांच्याकडून सुमारे सव्वादोन लाख रुपयांच्या किंमतीची जनावरे व चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक बालाजी गायकवाड यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस नाईक श्री. धादवड हे करीत आहेत.

जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद
सोलापूर : विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करुन परिसरात दहशत माजविणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना विजापूर नाका डी. बी. पथकाने जेरबंद केले आहे. महादेव विजय शिवशरण (रा. भैरु वस्ती, सुशिल मराठी शाळेजवळ) आणि सुनिल ऊर्फ आनंद काशिनाथ जाधव (रा. लिमयेवाडी), रोहित ऊर्फ भावड्या पंडित हत्तुरे (रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी क्र. दोन) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, मोबाईलसह 98 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com