बार्शीत विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु

barshi aandolan.jpg
barshi aandolan.jpg

बार्शी(सोलापूर)ः महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक कृती समितीच्यावतीने 24 सप्टेंबरपासून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी अश्वासित प्रगती योजनेचा पूर्वलक्षी प्रभावाने लाभ द्यावा व सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळावा यासह इतर मागण्यांसाठी लेखणी बंद,आवजार बंद आंदोलन सुरू झाले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे. या आंदोलनास सूटा,मागासवर्गीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. 

आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना, सोलापूर युनिव्हर्सिटी ऑफिसर फोरम, कास्ट्राईब कर्मचारी संघटना,आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, महाविद्यालयीन महासंघ या संघटना एकत्र येवून आंदोलनात सहभागी आहेत. 
कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ, उच्च शिक्षण सहसंचालक, महाविद्यालयांचे प्राचार्य यांना निवेदने सादर करण्यात आली आहेत. बार्शीमध्ये सर्व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. 

उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मागण्या मान्य नाही केल्यास पूढे 1 ऑक्‍टोबर 2020 पासून विद्यापीठे व महाविद्यालये बंद आंदोलन करण्यात येणार आहे. 
आश्वासीत प्रगती योजनेचे रद्द केलेले जीआर पुर्नजिवीत करून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, विद्यापीठ कर्मचारी व अधिकारी यांना सातवा वेतन आयोग द्या, 5 दिवसांचा आठवडा लागू करा, महाविद्यालयाने व विद्यापीठातील शिक्षकेतरांची रिक्त पदे भरावीत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करा, शासनाचे व वित्त विभागचे शासकीय कर्मचाऱ्यांचे जीआर निघालेल्या दिवसापासूनच लागू करा, शिक्षकेतरांच्या प्रश्नांसाठी डॉ.सोमजी पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे पुर्नगठन करा, समिती कार्यन्वीत करा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. 
आंदोलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक कृती समितीचे सर्व पदाधिकारी तसेच तानाजी ठोंबरे, राज्य कृती समिती सहसंघटक प्रविण मस्तुद, उमेश मदने, विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष गजानन काशिद, भिमा मस्के, ए.बी.कुलकर्णी, प्रशांत चोरमूले, आरती रावळे, वसंत सतकाळे, विलास कोठावळे, दत्ता भोसले, मल्लीकार्जून हायनाळ, हणुमंत कारमकर, दत्तात्रय पवार, गणेश कारंजकर, दत्ता वाघे, अमर कांबळे, अशोक पवार, परमेश्वर पवार, सुरेश दराडे, जितेंद्र गाडे, पांडूरंग भोंग, श्रीकांत वाघमारे, भागवत सरक, कैलास कांबळे प्रयत्नशील आहेत. 

संपादनः प्रकाश सनपूरकर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com