सोलापूरच्या रस्ते बांधणी विक्रमाबद्दल संजय कदम यांचा गडकरी यांच्याकडून गाैरव

kadam new.jpg
kadam new.jpg


सोलापूर : सोलापूर ते विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर केवळ 18 तासात 25 किलोमीटरचे डांबरीकरणाचे काम करण्याचा विक्रम केल्याबद्दल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक संजय कदम यांचा सन्मान केला. 
सोलापूर-विजापूर महामार्गावर चौपदरीकरणाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आयजीएम या मक्तेदाराच्या माध्यमातून केवळ 18 तासात एका लेनचे 25 किलोमीटर महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या विक्रमाची वर्ल्ड लिम्का बुक मध्ये नोंद झाली आहे. त्याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक संजय कदम यांना प्रमाणपत्र देऊन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सन्मानित केले. सोलापूर- विजापूर महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत पूर्ण करून एक नवा विक्रम केला आहे. यावेळी अत्याधुनिक यंत्रसामग्री व केवळ 500 मनुष्यबळ असतानादेखील इतक्‍या मोठ्या प्रमाणात हे काम करण्याचा विक्रम करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com