सोशल मीडियावर आला विविध चॅलेंजेसचा ट्रेंड; विविध भावभावनांची छायाचित्रे टाकणे झाले सुरू 

Challenges Trend
Challenges Trend

अक्कलकोट (सोलापूर) : सोशल मीडिया हा जेवढा लाभदायी किंवा मनोरंजक तेवढा तो अधिक डोकेदुखीही होणारा ठरतो आहे, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. पण फेसबुक या समाज माध्यमावर गेल्या दोन दिवसांपासून विविध चॅलेंजेसचा ट्रेंड मात्र जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. यात आपले आयुष्यभराचे जीवनसाथी असलेले पती-पत्नी, आपल्या जवळचा मित्रपरिवार, आपली मुलगी, आपले जीवनातील खळाळते हास्य आदी विविध विषय हाती घेऊन ते आपल्या मित्रांपर्यंत पोचविले जात आहे. त्याला एकमेकांचा भरघोस प्रतिसादही मिळत असल्याने तो ट्रेंड वाढताना आणि त्याचा आनंद घेताना दिसत आहे. 

या ऑनलाइनच्या जमान्यात आणि कोरोना काळात मित्रपरिवार व नातेवाईक यांच्याकडे जाणे-येणे हे अगदीच अत्यावश्‍यक असल्याशिवाय इच्छा असून देखील थांबले आहे. यासाठी आपले कुटुंब व आपण आहे त्या परिस्थितीत आनंदात असल्याचे दर्शविणारे नवी-जुनी छायाचित्रे टाकली जात आहेत. आणि त्याचे एकत्रित समाधान व्यक्त होऊन त्याचा आनंद लुटला जात आहे. यामुळे एकमेकांची प्रत्यक्ष तर नाही पण या माध्यमातून संवाद साधला जात आहे. 

या झालेल्या वेगवेगळे ट्रेंडमध्ये आतापर्यंत "कपल चॅलेंज'मधून पती व पत्नीची एकत्रित छायाचित्र, "केसरी चॅलेंज'मधून केसरी रंगाच्या कपड्यातील छायाचित्रे, "मदर चॅलेंज'द्वारे आपल्या आईसोबतची छायाचित्रे, "सिंगल चॅलेंज'मधून आपले स्वतःची विविध आकर्षक वेशभूषेतील छायाचित्रे टाकणे, "स्टॅंड विथ फार्मर चॅलेंज'मधून बैलजोडी व शेतीची साधने सोबत असलेली छायाचित्रे, "ग्रुप चॅलेंज'च्या माध्यमातून एकत्रित, मित्रपरिवारासोबत असलेली जुनी छायाचित्रे, "फॅमिली चॅलेंज'द्वारे आपल्या कुटुंबाची दुर्मिळ एकत्रित छायाचित्रे शेअर करणे तसेच "डॉटर चॅलेंज' माध्यमातून आपल्या प्रिय मुलींच्या सोबतची छायाचित्रे, "ऍटीट्यूड चॅलेंजेस'मधून आपले दृष्टिकोन स्पष्ट करणे, "फादर चॅलेंज'द्वारे आपल्या पित्यासोबत फोटो शेअर करणे आदी बाबी आवर्जून शेअर केल्या जात आहेत. एकंदरीत, यातून आनंद मिळविणे हाच प्रयत्न होताना दिसत आहे. 

या विविध चॅलेंजेस ट्रेंडबद्दल अक्कलकोटचे निरंजन शहा म्हणाले, सध्या सुरू असलेला ट्रेंड हा खूपच आनंददायी आहे. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणे तसेच कोरोना साथीच्या काळात असलेला मानसिक तणाव थोडासा हलका करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. यामुळे आपले एकमेकांशी असलेले संबंध आणखी दृढ आणि 
जिव्हाळ्याचे होण्यास मदत होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com