ब्रेकिंग! ग्रामीणची रुग्णसंख्या चार हजाराच्या उंबरठ्यावर; आज 131 पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू 

2Corona_20Sakal_20times_4.jpg
2Corona_20Sakal_20times_4.jpg

सोलापूर : जिल्ह्यातील अकरा तालुक्‍यांत आतापर्यंत 29 हजार 53 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन हजार 943 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. रविवारी सापडलेल्या 131 रुग्णांचा त्यात समावेश असून चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील दोन हजार 248 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एक हजार 583 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अक्‍कलकोटमधील देशमुख गल्ली, नऱ्हेगाव, सिन्नूर, तडवळ, उडगी या गावात पाच रुग्ण सापडले. करमाळ्यातील भिम नगर, कानड गल्ली, मौलाली माळ, श्रावण नगर, सुमंत नगर, सुतार गल्ली, शेलगाव याठिकाणी 23 रुग्ण आढळले. माढ्यातील भांगे गल्ली, चांभार गल्ली, काटे वस्ती, इंडसइंड बॅंकेजवळ, सावली हॉटेलजवळ, शिवाजी नगर, कुर्डूवाडी, आलेगाव (बु.), पापनस, रिधोरे, उपळाई (बु.) या गावांत 31 रुग्णांची भर पडली. माळशिरसमधील अकलूज, लवंग, संग्रामनगर, माळीनगर येथे सात, तर मोहोळमधील अनगर, भांबेवाडी, देवडी, नरखेड, वडवळ, यावली या गावांमध्ये 16 रुग्णांची वाढ झाली आहे. उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ, कळमण, तळेहिप्परगा या गावांमध्ये चार, तर पंढरपुरातील भोसले चौक, चितळे वाडा, गोविंदपुरा, हनुमान मैदान, जुनी पेठ, कालिकादेवी चौक, संत पेठ, स्टेशन रोड, वेदांत भक्‍त निवास, कासेगाव, लक्ष्मी टाकळी, पुळूज, सरकोली, तुंगत येथे 19 रुग्ण सापडले. सांगोल्यातील महूद, बिर्ला सिमेंट कंपनी, बोरामणी, हिपळे, होनमुर्गी, कंदलगाव, मुस्ती, वळसंग येथे 19 रुग्ण सापडले. त्यामध्ये बोरामणी 11, यावलीत सात, रिधोऱ्यात 12, करमाळ्यातील बागवान नगरात नऊ रुग्ण (सर्वाधिक) सापडले आहेत.

'या' ठिकाणच्या चौघांचा बळी 
जिल्ह्यातील 11 तालुक्‍यातील मृतांची संख्या आता 112 झाली आहे. अक्‍कलकोट तालुक्‍यात 20, बार्शीत 34, करमाळ्यात दोन, माढ्यात सहा, मंगळवेढा, माळशिरस, सांगोल्यात प्रत्येकी एक, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापुरातील प्रत्येकी 11, पंढरपुरातील 16 आणि मोहोळ तालुक्‍यात नऊ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. रविवारी (ता. 2) वैराग येथील 70 वर्षीय महिलेचा, बार्शीतील सुभाष नगरातील 65 वर्षीय पुरुष, उत्तर सोलापुरातील नान्नज येथील 78 वर्षीय पुरुषाचा आणि अक्‍कलकोटमधील समर्थ चौकातील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर अक्‍कलकोट तालुक्‍याची रुग्णसंख्या 481, बार्शी 817, करमाळा 154, माढा 257, माळशिरस 242, मंगळवेढा 119, मोहोळ 279, उत्तर सोलापूर 307, पंढरपूर 560, सांगोला 117 आणि दक्षिण सोलापुरातील रुग्णसंख्या 610 झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com