कोरोनाच्या महामारीला आव्हान देणारे, प्राण वाचवणारे देवदूत ‘हेच’

Nurse fight to prevent corona virus
Nurse fight to prevent corona virus

सोलापूर : फक्त ८० हजारच पांढऱ्यापेशी शिल्लक राहिल्या आहेत. ॲडमिट करावं लागेल असं, जेव्हा ऐकलं तेव्हा पायाखालची जमीनच सरकली... कारण हा प्रसंग नवीनच होता. पप्पा यापूर्वी कधीच आजारी पडले नव्हते, पण अचानक ॲडमिट करायची वेळ आली... रुग्णालयात पोहोचल्यावर सिस्टरची लगबग सुरू झाली, अगदी रूम स्वच्छ करण्यापासून ते बेड लावून पप्पांना लवकरात लवकर सलाईन लावण्यापर्यंत... कारण यातील एक- एक क्षण महत्वाचा होता, डॉक्टरांनी सर्व प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं. मग औषध आणली गेली, ती पण डॉक्टरांकडून तपासून घेण्याचं काम सिस्टरने केलं. सर्व सिस्टरच्या ड्युट्या बदलत असत परंतु प्रत्येकामध्ये फक्त एकच सिस्टर दिसत होती. प्रत्येकीचं एकच काम पेशंटच्या देखभालीचं.
पप्पांच्या सोबत मी नेहमी असायचो, रोज मध्यरात्री हमखास खूप ताप यायचा. रात्री 2 वाजता असो किंवा 3 वाजता. सिस्टर सलाईन, इंजेक्शन्स घेऊन नेहमी तयार असायच्या. अगदी ताप जाईपर्यंत 10 सलाईन बाटल्या संपत. आणि नाईट ड्युटीला जी सिस्टर होती ती गरोदर होती. तरीही तिने रोज रात्री येणारा जीवघेणा ताप उतरवला. १५ दिवसानंतर डेंग्यूचा ताप पूर्णपणे निघून गेला. पण मागे बरीच नाती जोडून गेला. सिस्टरच्या रूपाने मला बहिण मिळाली. त्या सिस्टरला घरी बोलून आई पप्पांनी तिची ओटी भरली. परवाच कळालं की तिला मुलगा झाला आणि तिच्या मिस्टरने ‘पहिल’ पेढा पप्पांना आणून दिला. कारण ही तसंच होतं. त्या सिस्टरला आई- बाप नव्हते. तिचा जन्म झाल्यावर रस्त्यावर सोडून देण्यात आलं होतं तिला मरण्यासाठी. आज तीच सर्वांचा जीव वाचवत आहे जगण्यासाठी!

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तिचा सांभाळ एका माऊलीने करून तिचं लग्न लावून दिलं..! धन्य ती माऊली.. धन्य ती सिस्टर. ही कहाणी आहे एका हॉस्पिटलमधील ‘छोटी’ या नर्सची. या छोटी सारख्या अनेक मोठ्या मनाच्या नर्स आपली कामं अगदी मन लावून निरपेक्ष भावनेने करतात. सध्या यांच्यामुळेच अनेक परिवारात पुन्हा सौख्य आनंद निर्माण झालाय.
कोरोना, सारी असो किंवा कोणतीही वैद्यकीय आपत्ती आमच्या सिस्टर्स नेहमी तयार. अगदी तुटपुंजे वेतन, दिवसभराच्या- रात्रभराच्या ड्युट्या, वैद्यकीय सुविधांचा अभाव, सध्या तर स्वतः च्याच आयुष्याचा प्रश्न. तरीही या सर्वांवर मात करत निस्सीम सेवा, याचे मोल नाहीच..  घरातील संसाराचा गाडा हाकताना डोक्यात विचार, काळजी हॉस्पिटलमधील सिरीयस असणाऱ्या पेशंटचीच, हे नातंच दुर्मिळ. ‘कोणी कोणाच नसतं’ हे वाक्य फक्त नर्चस खोटं ठरवू शकते. सध्या कोरोना बाधितांच्या मदतीला त्या धावून जात आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांच्यावर हल्ले होत आहेत, समाजाकडून तिरस्काराची आणि वाळीत टाकल्याची वागणूक मिळत आहे. स्वतः च्या जीवावर उदार होऊन रुग्णांची मनोभावे सेवा करण्याचे हे फळ त्यांना मिळत आहे..?
खरंच आपण माणूस असूनही यांच्या उपकाराची जाणीवच नाही. भारताच्या लोकसंख्येच्या मानाने रुग्णालये फारच कमी प्रमाणात आहेत. या महामारीत प्रत्येक रुग्णाला योग्य वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी या सिस्टर सतत धडपडतात. जर का यातून कोण दगावलाच तर त्याची दुसरीकडे व्यवस्था करण्यास सध्या जागा मिळणे कठीणच. मर्यादित जागेवर असंख्य गोरगरीब रुग्णांवर उपचार करून त्यांना त्या जीवनदान देतात. या परिस्थितीत त्यांना सर्वांनी सहकार्य करून मान द्यायला हवा.
केईएम, सायन असो किंवा सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महारास सर्वोपच्चार रुग्णालय. तिथं याच सिस्टर्समुळे असंख्य प्राण सुरक्षित असून उपचार घेत आहेत. स्वतः चा जीव धोक्यात घालून कोरोनाच्या महामारीला आव्हान देणारे, प्राण वाचवणारे देवदूत हेच. परंतु समाजाकडून त्यांना योग्य सन्मानाची आवश्यकता आहे.
या सिस्टर्सनां (देवदूतांना) चांगल्या प्रकारचे किट, आरोग्यसुविधा,चांगलं वेतन मिळालं तरच यांचा खरा सन्मान होईल..
- सुबोध रमेश सुतकर
( प्राचार्य, यशोधरा प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सोलापूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com