किसान अधिकार दिवस पाळत कॉंग्रेसने केला कृषी विधेयकांचा निषेध 

congress karykram.jpg
congress karykram.jpg

सोलापूरः माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सोलापूर महापालिका आवारातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी केंद्रीय गृहमंत्री स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त कॉंग्रेस भवन येथे कार्यक्रम झाला. केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी कायदे केल्याचा आरोप करत कॉंग्रेसने आज किसान अधिकार दिवस पाळला. 

यावेळी आमदार प्रणिती शिंदे व शहराध्यक्ष प्रकाश वाले यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराध्यक्ष वाले म्हणाले, सरकारने दडपशाहीने मंजूर करुन घेतलेले शेतकरी आणि कामगार विरोधी कायदयामुळे शेतकरी आणि कामगारांच्या हक्कावर गदा येणार आहे. शेतकरी आणि कामगारांचे नुकसान होऊन खाजगी व्यापारी, कॉर्पोरेट कंपन्या यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे हे कायदे त्वरित रद्द करावेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची सक्ती करावी. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कायदेशीर संरक्षण देवून शेतकऱ्यांच्या हक्काची बाजारपेठ अस्तित्वात राहतील याची हमी द्यावी असे सांगितले. 

यावेळी गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुणकुमार शर्मा, माजी महापौर अलकाताई राठोड, आरिफ शेख, नलिनीताई चंदेले, नगरसेवक हाजी तौफीक हत्तुरे, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, अनुराधा काटकर, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, एनएसयुआयचे अध्यक्ष गणेश डोंगरे, दत्तु बंदपट्टे, हारून शेख, एन. के. क्षीरसागर, सिद्धाराम चाकोते, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, युवराज जाधव, उमेश सूरते, अंबादास गुत्तिकोंडा, किसन मेकाले गुरुजी, मणिकसिंग मैनावाले, विश्वनाथ साबळे, आझम सैफन, बसवराज म्हेत्रे, मनीष गडदे, केशव इंगळे, राजन कामत, अशोक कलशेट्टी, नागनाथ कदम, प्रमिला तुपलवंडे, अनिल मस्के, संध्याताई काळे, रफीक चकोले, जाबिर अल्लोळी, सहदेव ईप्पलपल्ली, हाजिमलंग नदाफ, संघमित्रा चौधरी, कय्यूम बलोलखान यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com