नॉर्थकोटची एक एकर जागा हस्तांतरित ! भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची बदलणार जागा

IMG-20210409-WA0267 (1).jpg
IMG-20210409-WA0267 (1).jpg

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मागील नॉर्थकोटच्या एक एकर जागेवर हलविण्यात येणार आहे. त्यासाठी जागा हस्तांरणाची प्रक्रिया आज पार पडली. वंचित बहूजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी त्यासाठी दोन दिवसांपूर्वी आयुक्‍तांना निवेदन दिले होते.

महापालिकेने पाठविला होता ठराव 
महापालिकेसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा नॉर्थकोटच्या मागील जागेत हलवावा. जेणेकरून जयंती, पुण्यतिथीनिमित्त त्याठिकाणी होणारी गर्दी होणार नाही, लोकांना अभिवादन करण्यास अडचणी येणार नाहीत, हा मार्ग बंद करावा लागणार नाही या हेतूने नॉर्थकोट स्कूलची एक एकर जागा मिळावी, असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने करून शासनाला प्रस्ताव सादर केला होता, अशी माहिती आनंद चंदनशिवे यांनी दिली. आता डॉ. आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरीत करून उर्वरित जागेत उद्यान विकसित करणे, नागरिकांसाठी बैठकीची व्यवस्था करणे, अशी कामे होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या मान्यतेनंतर नार्थकोट प्रशाला परिसरातील एक एकर जागेचे करारपत्र व हस्तांतर प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. यावेळी श्री. चंदनशिवे, नगररचना व भूमी मालमत्ता विभागाचे अधिकारी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संचालक उपस्थित होते. जागेची मोजणीही आज पार पडली. या जागेचा कब्जा महापालिकेकडे देण्यात आला. हस्तांतर करारपत्रावर शिक्षण संस्थेचे जिल्हा संचालक श्री. शिंदे व नॉर्थकोट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. एस. उडाणशिवे, नगररचना विभागाचे सहायक संचालक लक्ष्मण सरवदे आदींनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी मंडई व उद्यान समिती सभापती गणेश पुजारी, ए. के. तांबोळी, भारत जाधव, अविनाश भडकुंबे, तुकाराम कांबळे, कृष्णा कटकधोंड, सुरेश पागद, भिमा मस्के आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com