
जागतिक एड्स दिनानिमित्त सारथी यूथ फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ ऑनलाइन पद्धतीने पार पडला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये आनंद मसलखांब (सोलापूर) तर निबंध स्पर्धेमध्ये मल्लिकार्जुन पाटील (कोल्हापूर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
सोलापूर : जागतिक एड्स दिनानिमित्त सारथी यूथ फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ ऑनलाइन पद्धतीने पार पडला.
युवक-युवतींमध्ये एचआयव्ही - एड्सबाबतच्या गैरसमजुती कमी करून शास्त्रीय माहितीची जनजागृती व्हावी म्हणून जागतिक एड्स दिनानिमित्त राज्यस्तरीय डिजिटल वक्तृत्व स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. जावेद नगारे होते. स्पर्धांच्या माध्यमातून एचआयव्ही / एड्सविषयी सारथी करीत असलेली जनजागृती खूप महत्त्वपूर्ण आहे, असे मत बापूसाहेब जमादार यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे
या निकालांचे वाचन प्रमुख पाहुण्यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र तसेच इतर स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. परीक्षक म्हणून रामचंद्र वाघमारे यांनी काम पाहिले. सहभागी स्पर्धकांनी मनोगते व्यक्त केली. या वेळी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा रोटे. पूनम देवदास, सचिव रोटे. अर्जुन आष्टगी यांच्यासह राज्यातील सहभागी स्पर्धक ऑनलाइन झूम मीटिंगमध्ये सहभागी झाले होते. पूनम देवदास यांनी प्रास्ताविक केले. भीमराव भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर अर्जुन आष्टगी यांनी आभार मानले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल