राजस्थानी विकास मंडळाच्या समाज भुषण पुरस्काराने पंडित बाळकृष्ण व्यास सन्मानीत 

rajasthani puraskar.jpg
rajasthani puraskar.jpg

सोलापूरः येथील राजस्थानी विकास मंडळाच्या वतीने राजस्थानी समाजभूषण पुरस्कार पंडित बाळकृष्ण व्यास यांना प्रदान करण्यात आला. 
मंडळाचे संस्थापक स्व. रामनिवास जाजू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या पंडित बाळकृष्ण व्यास यांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली. महावीर बॅंकेचे उपाध्यक्ष तिलोकचंद निमानी व पंडित मदन मोहन व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्री व्यास यांना 11 हजार रुपये व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आहे. 
यावेळी श्री. व्यास यांनी सत्काराला उत्तर देताना वेद, मंत्र आणि ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात माहिती दिली. तसेच पुरस्कारा दिल्याबद्दल मंडळ पदाधिकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी दायमा समाज अध्यक्ष श्रीनिवास दायमा यांचे भाषण झाले. तिलोकचंद निमाजी यांनी स्व. रामनिवास जाधव यांच्या कार्याची माहिती दिली. मदन मोहन व्यास यांनी अर्पण, दर्पण व समर्पण या मुद्‌द्‌यावर त्यांचे विचार मांडले. 
यावेळी व्यास परिवाराचे सदस्य धनराज मणियार, माणिकचंद डागा, जवाहर जाजू, भागचंद कोचर, राजाराम उपाध्ये, रमेश बियाणी, गोविंद लाहोटी, कमलेश झंवर, पुरुषोत्तम बलदवा, संतोष काबरा, गोपाल मंत्री, लक्ष्मीकांत खंडेलवाल, गोविंद मानधनिया आदी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष विजय जाजू यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव कल्पेश मालू यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय नंदा करवा यांनी करून दिला. पुरुषोत्तम बलदवा यांनी आभार मानले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com