अबब.... पहिल्याच दिवशी झाले `इतके` किलो प्लास्टिक गोळा

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

आज रेल्वे स्थानकासह चित्रपटगृहात प्लास्टिक शोधमोहीम 
बंदी असूनही महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी प्लास्टिक पडलेले आढळून येते. त्यामुळे पर्यावरण विभागाने पुन्हा एकदा विशेष मोहीम राबविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार मोहिमेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आज (शनिवारी) रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, एसटी स्टॅंड, रिक्षा स्थानक, निवासी क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र, बाजारपेठ, चित्रपटगृहे या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे

सोलापूर - प्लास्टिकमुक्ती मोहिमेअंतर्गत शहरात 14 ते 18 फेब्रुवारीदरम्यान प्लास्टिक वेचक मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत जमा करण्यात आलेल्या प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी तब्बल 161 किलो प्लास्टिक जमा झाले. त्यासाठी दोन हजार 659 जणांनी सहभाग घेतला. 

हेही वाचा - या महापालिकेने बदलले चक्क कॅलेंडर 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ३ लोक, लोक हसत अाहेत, लोकं बसली आहेत, ताल‍िका, आंतरिक आणि खाद्य
सोलापूर ः प्लास्टिक मुक्ती मोहिमेची जबाबदारी असलेले पथक 

शाळा, महाविद्यालयात मोहिम 
शहरातील 34 शाळांमध्ये 99 किलो, सोनी, संभाजीराव शिंदे आणि शरदचंद्र पवार महाविद्यालयात आठ किलो, महापालिका व खासगी रुग्णालयांतून पाच किलो, पासपोर्ट, महावितरण, महापालिकेच्या विभागीय कार्यालयांतून 10 किलो, सिद्धेश्‍वर मंदिर आणि इंदिरानगर येथील मंदिरातून 11 किलो तर होम मैदान, केलएलई मैदान, संभाजी शाळा मैदान, सोनी महाविद्यालय मैदान या परिसरातून आठ किलो प्लास्टिक जमा झाले. 

हेही वाचा - शिवराय मनामनात.. शिवजयंती घरांघरांत 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ९ लोक, लोक हसत अाहेत, लोकं उभी आहेत आणि बाहेरील
मोहिमेत सहभागी विद्यार्थिनी

रस्ते, दुभाजकांमधीलही स्वच्छता होणार 
प्लास्टिकमुक्ती मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या मार्फत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. विभागीय कार्यालयांकडील स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही सहभाग घेतला जाणार आहे. रस्ता, रस्ता दुभाजक, बगीचा, सार्वजनिक ठिकाणे, खुले प्लॉट, नदी, नाले या ठिकाणी ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत विद्यार्थी, स्थानिक नागरिक, महाविद्यालये, एनसीसी, स्काऊट, स्पोर्टस क्‍लब, हाउसिंग सोसायट्या, रोटरी व लायन्स क्‍लब, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी नागरिकांच्या सहभागातून कचरा वेचक मोहीम राबविली जाणार आहे. अन्न व परवाना अधीक्षक श्रीराम कुलकर्णी, केदार गोटे, सूर्यकांत लोखंडे, महादेव शेरखाने, साईनाथ ताटे यांच्यासह त्यांचे सहकारी ही मोहीम राबवीत आहेत. 

.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: plastic ban in solapur