तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का? घरात बसून तुमीच ‘असं’ करा चेक

अशोक मुरुमकर
Friday, 8 May 2020

अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16.146 कोटी रुपये पाठवले आहेत.  हा या योजनेतील पहिला हप्ता आहे. आपल्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे पाहण्याची खूप सोपी प्रक्रिया आहे. यासाठी शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या संकेस्थळावर जावे लागेल. ऑड्राईड मोबाईवरुन ही प्रक्रिया घर बसल्या करता येत आहे.

सोलापूर : देशभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरला रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य सरकार गरीब व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. या  लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने'चाही लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्पटप्याने तीन हपत्यात वर्षाचे सहा हजार रुपये सरकारकडून पाठवले जातात.


संकेतस्थळ ओपन केल्यावर गोल केलेल्या फार्मर कॉर्नर टॅबवर क्लिक करा

अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16.146 कोटी रुपये पाठवले आहेत.  हा या योजनेतील पहिला हप्ता आहे. आपल्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे पाहण्याची खूप सोपी प्रक्रिया आहे. यासाठी शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या संकेस्थळावर जावे लागेल. ऑड्राईड मोबाईवरुन ही प्रक्रिया घर बसल्या करता येत आहे.


संकेतस्थळ ओपन केल्यावर गोल केलेल्या बेनीफीटी लिस्ट या टॅबवर क्लिक करा

असे करा चेक
pmkisan.gov.in या संकेस्थळावर लॉग इन करावे त्यानंतर संपूर्ण पेज ओपन होईल. त्यावर ‘होम’, ‘गाईडलाईन’, ‘लेटर/ सक्युलर’, ‘फार्मर कॉर्नर’ आदी विभाग दिले आहेत.  त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' या टॅबवर क्लिक करावे.  क्लिक केल्यानंतर संबंधितांच्या नावाची या योजनेसाठी नव्याने नोंदणी देखील करता येते. त्यानंतर या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव येथे मिळू शकेल. यामध्ये लाभार्थ्यांच्या नावाची यादी, लाभार्थ्यांचा काय स्टेट्‌स आहे. याची माहिती मिळेल. त्यात लाभार्थ्यांच्या यादीवर क्लिक केल्यानंतर राज्य, जिल्हा, उपजिल्हा, तालुका विभाग (ब्लॉक), गावाचे नाव टाकावे. प्रत्येक टॅबवर क्लिक केल्यानंतर ऑफशन येते. तेच आपल्याला हवे ते निवडावे. सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक केल्यांनतर यादी येत आहे. त्यातून लाभार्थ्याने नाव शोधावे. 

सोलापूर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन यादी?

सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी येथे अपलोड केली आहे. याठिकाणी तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे देखील समजेल. यासंदर्भातील माहिती तुम्ही किसान आधार नंबर/अकाऊंट नंबर आणि मोबाइल नंबरच्या माध्यमातून देखील मिळवू शकता. 'फार्मर कॉर्नर'वर जाऊन 'लाभार्थी सूची' (लाभार्थी यादी) च्या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल.,


गोल केलेली लाभार्थ्यांची यादी आहे. यामध्ये तुमचे नाव शोधा

1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे आता नवीन यादी अपलोड केली जाईल. त्याआधी शेतकऱ्यांना त्यांचे नाव या यादीमध्ये तपासण्यासाठी आणि यामध्ये नाव देण्यासाठी अवधी दिला आहे. यासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी आणि तुमची माहिती अपडेट करण्यासाठी दोन पर्याय आहेत. pmkisan.gov.in या वेबसाइटवरून किंवा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही मोबाइलमध्ये प्ले स्टोअर वरून किसान मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Kisan Yojana money credited to farmers accounts