अंत्यसंस्कारास जमलेल्या  50 जणांवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारप्रसंगी तोंडाला मास्क लावणे व जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदीचा आदेश झुगारून साथीचा प्रसार होईल, असे कृत्य करून मानवी जीविता व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्‍यात येईल व संसर्ग पसरवण्याचे घातकी कृती केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

मंगळवेढा (सोलापूर) : जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदीचा आदेश झुगारून येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारप्रसंगी एकत्र जमल्याच्या कारणावरून मृताचे नातेवाईक, पै-पाहुणे व इतर उपस्थित अशा 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
याबाबतची फिर्याद पोलिस नाईक गजानन पाटील यांनी दिली.                                येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारप्रसंगी तोंडाला मास्क लावणे व जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदीचा आदेश झुगारून साथीचा प्रसार होईल, असे कृत्य करून मानवी जीविता व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्‍यात येईल व संसर्ग पसरवण्याचे घातकी कृती केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. यात अजयकुमार सरोज, ज्ञानेश्‍वर डांगे, राजेंद्र चिंचकर, अण्णा सोमदळे, महादेव चेळेकर, बंडू उन्हाळे, बापू देवकर, एकनाथ हजारे, सुभाष हजारे, सिद्धेश्‍वर सौंदळे, मच्छिंद्र वाकडे, सतीश इंगळे, प्रवीण उन्हाळे, बाळासाहेब काळे, विजय चेळेकर, गणपत चेळेकर, सुखदेव उन्हाळे, संजय हजारे, दत्तात्रय आसबे, सोमनाथ हजारे, ज्ञानेश्‍वर हजारे, शिवाजी सोमदळे, शंकर सोमदळे, सचिन लेंडवे, महेश आवळेकर, सचिन कौंडुभैरी, लक्ष्मण बुर्ले, सिद्धेश्‍वर भोसले, महेश नागणे, विजय हजारे, चंद्रकांत हजारे, तात्यासाहेब उन्हाळे, विजय सोमदळे, महादेव मोरे, इन्नुस शेख, अमर हजारे, ज्ञानेश्‍वर ओमणे (सर्व जण रा. मंगळवेढा), बाळासाहेब नागणे (आंधळगाव), धोंडिबा कळकुंबे, विश्‍वास खुनतकर, हनुमंत खुनतकर, विकास भोसले, भारत कळकुंबे, दादासाहेब कळकुंबे (सर्वजण रा. कासेगाव, ता. पंढरपूर), सुखदेव नागणे, औदुंबर नागणे, नामदेव नागणे (सर्वजण रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर), उमेश शिंदे (रा. औंढी, ता. मोहोळ), अजित दांडगे (रा. कोंढारकी, ता. पंढरपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police crimes against 50 persons in Mangalwedha taluka