पक्ष्यांचा अधिवास जपण्यासाठी पोलिसांनी बसवली ठाण्याच्या आवारात कृत्रिम घरटी 

police gharati new.jpg
police gharati new.jpg

सोलापूरः पोलिस ठाणे म्हणजे वाद....अपघात.... आणि गुन्हे... असे चित्र कायम असते. पण चावडी पोलिस ठाण्यात मात्र पक्ष्यांचा किलबिलाट वाढावा यासाठी ठाण्याच्या आवारातील झाडांवर पक्ष्यांसाठी कृत्रीम घरटी बसवून एका वेगळ्या संवेदनशीलतेचा परिचय पोलिसांनी करून दिला. 

शहरातील फौजदार चावडी पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांनी नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, बाळेच्या सदस्यांना निमंत्रित केले होते. या ठाण्याच्या परिसरात भरपूर झाडामुळे पक्ष्यांसाठी सुद्धा योग्य असा नैसर्गिक अधिवास आहे. त्यामुळे पोलिसांनी या परिसरामध्ये कृत्रिम घरटे लावण्याच्या निश्‍चय केला. 

यावेळी बोलताना श्री संजय साळुंके म्हणाले की, प्रदूषण आणि वृक्षतोड याचा परिणाम जीवसृष्टीतील पशुपक्षी, प्राणी आणि मनुष्य यांच्यावर होताना दिसत आहे. आज झाडांची बेसुमार कत्तल व सिमेंट कॉंक्रीटचा वापर करून बांधलेल्या इमारती मुळे चिमण्या पक्षी पाखरे यांना त्यांचे घरटे बनवण्यासाठी आवश्‍यक असणारा असणारे कप्पे, मोकळी जागा मिळत नाही. त्यामुळे चिमण्यांनी तर आज शहराकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण अशा पक्षांसाठी त्यांचे खाद्य, घरटे यांची व्यवस्था केली तर ते शहराकडे वळतील असे त्यांनी सांगितले. 
तसेच नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, बाळे टीम तर्फे कृत्रिम घरटी बसवण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नैसर्गिक वातावरणाचा अनुभव यावा ते ताणतणावापासून दुर राहावेत यासाठी उपक्रम आयोजित केला. यावेळी निसर्गप्रेमी संतोष धाकपाडे, पंकज चिंदरकर, अजित चौहान, सुरेश क्षिरसागर, सोमानंद डोके, महादेव डोंगरे, अजय हिरेमठ, विनय गोटे, सिद्धांत चौहान, रुद्रप्रताप चौहान आदी उपस्थित होते. 

सर्वच ठाण्यात घरटी असावीत 
ठाण्याच्या परिसरात असलेली झाडे ही पक्ष्यांसाठी आश्रयस्थाने आहेत. या ठिकाणी पक्ष्यासाठी काही कृत्रिम घरटी लावून परिसर पक्ष्यांसाठी अधिक चांगला ठरावा म्हणून हा उपक्रम राबवला. यापुढे जाऊन सोलापूरातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हा उपक्रम घेण्याचा मानस आहे. 
- संजय साळुंके, वरिष्ठ पोलिस निरिक्षक चावडी पोलिस ठाणे, सोलापूर  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com