मंगळवेढा तालुक्यात 186 ग्रामपंचायत जागांसाठी उद्या मतदान

हुकूम मुलानी
Thursday, 14 January 2021

एकूण 23 ग्रामपंचायतीच्या 223 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच त्यामधील सर्व 30 जागा या बिनविरोध झाल्या. त्यामुळे सध्या 186 जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. महसूल प्रशासनाने याबाबतचे नियोजन करत मंगळवेढा येथील शासकीय गोदामातून निवडणुकीसाठी चे साहित्य आज सकाळी शिस्तबद्ध पद्धतीने महामंडळाच्या 14 बसेसमधून 22 गावी पाठवले. 

मंगळवेढा (सोलापूर) ः तालुक्‍यातील 22 ग्रामपंचायतीमधील 94 प्रभागातील 186 जागेसाठी शुक्रवारी (ता.15) मतदान होत असून प्रशासनाची निवडणुकीबाबतची तयारी पूर्ण झाली असून नऊ गावे संवेदनशील असून यामध्ये कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 

हेही वाचाः लर्न कोच, रिन्युएबल एनर्जी, स्मार्ट चार्जरची निर्मिती ः संगणक अभियंता अविनाश गवळी यांची कामगिरी 

एकूण 23 ग्रामपंचायतीच्या 223 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच त्यामधील सर्व 30 जागा या बिनविरोध झाल्या. त्यामुळे सध्या 186 जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. महसूल प्रशासनाने याबाबतचे नियोजन करत मंगळवेढा येथील शासकीय गोदामातून निवडणुकीसाठी चे साहित्य आज सकाळी शिस्तबद्ध पद्धतीने महामंडळाच्या 14 बसेसमधून 22 गावी पाठवले. 
उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, नायब तहसीलदार सुधाकर मागाडे, निवडणूक शाखेचे उमाकांत मोरे यांच्यासह आरोग्य विभागाने नियोजन केले. मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष 94, सहायक मतदान केंद्राध्यक्ष 94, मतदान अधिकारी एक 94, मतदान अधिकारी दोन 94, मतदान अधिकारी तीन 94, शिपाई 94 याशिवाय राखीव 120 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. 
मतदाना दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर चा वापर सक्तीचा करण्यात आलेला आहे.तर पोलिस प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक 1, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरिक्षक 5, पोलिस 78, होमगार्ड 51 इतका बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामध्ये लेंडवेचिंचाळे, नंदेश्वर,भोसे, हुलजंती,बोराळे, मरवडे सिद्धापूर,सलगर बु, माचणूर हे नऊ गावे संवेदनशील असून निवडणूक होत असलेल्या बहुतांश गावात तील स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी गावे असल्यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची बनली. शिवाय मतदारांचे चोचले देखील पुरविण्यात आले. त्यामुळे मतदानासाठी बाहेरगावी गेलेल्या मतदारांना देखील त्यांनी मतदानासाठी गावात पाचारण केले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तुलना करता या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढणार असला तरी वाढलेल्या टक्‍क्‍याची संक्रात कोणत्या उमेदवारावर बसणार याची चर्चा सुरू आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Polling for 186 Gram Panchayat seats in Mangalvedha taluka tomorrow