esakal | आरक्षणासाठी लिंगायत समाज आंदोलनाच्या तयारीत 
sakal

बोलून बातमी शोधा

lingayat samaj

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती भागातील सोलापूर, उस्मानाबाद, लातुर, नादेंड परिसरात मोठ्या संख्येने लिंगायत समाजाचे संख्याबळ आहे. लातुर येथे लवकरच आंदोलनाची रुपरेषा अंतिम केली जाणार आहे. या बैठकीत उदगीर शहरातील विविध विषयावर देखील चर्चा करण्यात आली तसेच डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज व कंबळीबाबांचे स्मरण करण्यात आले. उदगीर तालुक्‍यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते महासंघात प्रवेश करत असल्याचे प्रांताध्यक्ष प्रा.बिरादार यांनी सांगितले. 

आरक्षणासाठी लिंगायत समाज आंदोलनाच्या तयारीत 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः लिंगायत समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी लिंगायत महासंघ आंदोलनाच्या तयारीला लागला आहे, अशी माहिती महासंघाचे जिल्हा संघटक सुरेश वाले यांनी दिली आहे. 

श्री. वाले यांनी सांगितले की, लिंगायत महासंघाची नुकतीच एक बैठक उदगीर येथे झाली आहे. महासंघाची ही बैठक महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये लिंगायत समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भावना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या मुद्यावर लिंगायत समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, यादृष्टीने पुढील काळात आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. 

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती भागातील सोलापूर, उस्मानाबाद, लातुर, नादेंड परिसरात मोठ्या संख्येने लिंगायत समाजाचे संख्याबळ आहे. लातुर येथे लवकरच आंदोलनाची रुपरेषा अंतिम केली जाणार आहे. या बैठकीत उदगीर शहरातील विविध विषयावर देखील चर्चा करण्यात आली तसेच डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज व कंबळीबाबांचे स्मरण करण्यात आले. उदगीर तालुक्‍यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते महासंघात प्रवेश करत असल्याचे प्रांताध्यक्ष प्रा.बिरादार यांनी सांगितले. 

यावेळी महादेव हरकळे, प्रा. महेश बापाटले (पाटील) धोडीहिप्परगेकर, प्राचार्य तानाजी सोनटक्के, प्रा.डॉ. राजेश्‍वर पाटील, भरत करेप्पा, कवी शिवाजी स्वामी आदींची भाषणे झाली. बैठकीसाठी जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, तालुकाध्यक्ष अमरनाथ मुळे, प्रभुराज कप्पीकेरे, शिवराज रंडयाळे, शांतवीर मुळे, गणेश कारभारी, मुख्याध्यापक गुरुडे, श्री.करडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन श्री. स्वामी यांनी केले तर तालुका प्रसिध्दी प्रमुख सुभाष शेरे यांनी मानले. 

संपादन : अरविंद मोटे 

go to top