पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्षपूर्तीनिमित्त पत्र; ‘काय’ म्हटलंयं त्यात वाचा

अशोक मुरुमकर
Tuesday, 23 June 2020

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. अशीच एक म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. देशातील सर्वच शेतकऱ्यांचा या योजनेत सामावेश केला असून सुमारे नऊ कोटी ५० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात या योजने अंतर्गत ७२ हजार कोटीपेक्षा जास्त निधी केंद्रान जमा केला आहे.

सोलापूर : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. अशीच एक म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. देशातील सर्वच शेतकऱ्यांचा या योजनेत सामावेश केला असून सुमारे नऊ कोटी ५० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात या योजने अंतर्गत ७२ हजार कोटीपेक्षा जास्त निधी केंद्रान जमा केला आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाले असल्याने पंतप्रधान मोदींने पत्र लिहीले आहे. याचे वाटप गावागावात केले जात आहे. यात पैसे जमा केल्याचे म्हटलं आहे आहे. चार पानाचे हे पत्रक आहे. 

भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या पत्राचे वाटप केले जात आहे. यामध्ये म्हटलंयं की, ‘आजपासून एक वर्षापूर्वी लोकशाहीच्या इतिहासात एक सोनेरी अध्याय जोडला गेला. देशात अनेक दशकांनंतर नागरिकांनी एखाद्या सरकारला पूर्ण बहुमत देऊन सलग दुसऱ्यांदा सत्तेची जबाबदारी सोपिवली आहे. २०१४ मध्ये देशातील नागरिकांनी मोठे परिवर्तन होण्यासाठी मतदान केले होते. तसेच देशातील धोरण आणि व्यहवार बदलण्यासाठी मतदान केले. त्यानंतर पाच वर्षात देशातील व्यवस्था ‘जैसे थे’ वृत्ती आणि गैरव्यहवाराच्या दलदलीतून बाहेर पडलेल्या पाहिल्या आहेत. त्या पाच वर्षात देशाने अंत्योद्याच्या भावनेने गरीबांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी सरकारी व्यवस्था परिवर्तन होताना पाहिले. देशाची प्रतिष्ठा वाढली तशी दुसरीकडे गरिबांचा सन्मानही वाढला असं त्यात म्हटलं आहे. २०१९ मध्ये देशातील नगारिकांचा आशिर्वाद देशाच्या भव्य स्वप्नांसाठी व आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी होता. असं म्हटलं आहे.

योजनेबद्दल...

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेतील पहिला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जातात. या खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे पाहण्याची प्रक्रिया ही सोपी आहे. यासाठी शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या संकेस्थळावर जावे लागते. किंवा ऑड्राईड मोबाईवरुन ही प्रक्रिया घर बसल्या करता येते.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

असे करा चेक
pmkisan.gov.in या संकेस्थळावर लॉग इन केल्यानंतर संपूर्ण पेज ओपन होईल. त्यावर ‘होम’, ‘गाईडलाईन’, ‘लेटर/ सक्युलर’, ‘फार्मर कॉर्नर’ आदी विभाग दिले आहेत.  त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' या टॅबवर क्लिक करावे.  क्लिक केल्यानंतर संबंधितांच्या नावाची या योजनेसाठी नव्याने नोंदणी देखील करता येते. त्यानंतर या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव येथे मिळू शकेल. यामध्ये लाभार्थ्यांच्या नावाची यादी, लाभार्थ्यांचा काय स्टेट्‌स आहे. याची माहिती मिळेल. त्यात लाभार्थ्यांच्या यादीवर क्लिक केल्यानंतर राज्य, जिल्हा, उपजिल्हा, तालुका विभाग (ब्लॉक), गावाचे नाव टाकावे. प्रत्येक टॅबवर क्लिक केल्यानंतर ऑफशन येते. तेच आपल्याला हवे ते निवडावे. सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक केल्यांनतर यादी येत आहे. त्यातून लाभार्थ्याने नाव शोधावे. 

नवीन यादी?
सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी येथे अपलोड केली आहे. याठिकाणी तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे देखील समजेल. यासंदर्भातील माहिती तुम्ही किसान आधार नंबर/अकाऊंट नंबर आणि मोबाइल नंबरच्या माध्यमातून देखील मिळवू शकता. 'फार्मर कॉर्नर'वर जाऊन 'लाभार्थी सूची' (लाभार्थी यादी) च्या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य,

जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल., 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे आता नवीन यादी अपलोड केली जाईल. त्याआधी शेतकऱ्यांना त्यांचे नाव या यादीमध्ये तपासण्यासाठी आणि यामध्ये नाव देण्यासाठी अवधी दिला आहे. यासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी आणि तुमची माहिती अपडेट करण्यासाठी दोन पर्याय आहेत. pmkisan.gov.in या वेबसाइटवरून किंवा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही मोबाइलमध्ये प्ले स्टोअर वरून किसान मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi letter to the citizens on the occasion of the Central Government year ago