नक्षत्र मंडळ व स्त्रोत्रसुमनांजली पुस्तकांचे प्रकाशन 

ranjana unhale.jpg
ranjana unhale.jpg

सोलापूरः नक्षत्रमंडळ आणि स्तोत्रसुमनांजली भाग - आठ या रंजना उन्हाळे (बार्शी) यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन ऑनलाईन पद्धतीने सोमवारी (ता.16) करण्यात आले. सृजनरंग प्रकाशनाने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. 

सनदी अधिकारी अरुण उन्हाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख होते. स्तोत्रसुमनांजलीच्या आठव्या भागाचे प्रकाशन करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य व नक्षत्रमंडळ पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध ज्योतिषकार प्राचार्य रमणलाल शहा यांच्या हस्ते झाले. 

स्तोत्र हा भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग आहे. त्यामुळेच स्तोत्र पठणाचे महत्त्व रंजना उन्हाळे या पुस्तकाद्वारे व्यक्त करतात. जगद्गुरु शंकराचार्य, प्राचार्य रमणलाल शहा या अधिकारी व्यक्तींच्या हस्ते प्रकाशन म्हणजे आशीर्वादच आहे, असे मत डॉ. देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. 
यावेळी जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले की, देवदेवतांची नावे त्या-त्या वेळी त्या कार्यानुसार पडलेली आहेत. आपल्या प्रत्येक कर्माचा पाया श्रद्धा आहे आणि ती प्रत्येकाकडे असतेच. पण अशी श्रद्धापूर्वक कर्मं करताना योग्य मार्गदर्शनाची आवश्‍यकता असते. भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात आत्मोन्नतीसाठी श्रद्धा बळकट हवी असे भगवंत सांगतात. तर सतराव्या अध्यायात अश्रद्धेने केलेले कोणतेच काम उपयोगी होत नाही असे सांगितले आहे. म्हणूनच कर्म श्रद्धापूर्वक अंतकरणाने करावीत असे त्यांनी सांगितले. 
सृजनरंग प्रकाशनाच्या स्मिता भागवत यांनी पुस्तके प्रकाशित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. लेखिका रंजना उन्हाळे यांनी लेखनामागचा विचार व्यक्त केला. ऋचा व्यास यांनी आभार मानले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com