पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची लेखणी बंद 

solapur univercity
solapur univercity

सोलापूर : राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू केलेला सातवा वेतन आयोग विद्यापीठ कर्मचाऱ्यांना अद्यापही लागू न झाल्याने विद्यापीठ कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट आहे. अनेकदा मंत्रालय स्तरावर बैठका झाल्या, मात्र आश्वासनाशिवाय काही मिळाले नाही. पदरी निराशा आल्याने ऐन परीक्षेच्या काळात कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत.

याचाच भाग म्हणून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना, सोलापूर युनिव्हर्सिटी ऑफिसर फोरम, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना अधिकारी संघटना, या संघटनांच्या संयुक्तरित्या सातवा वेतन आयोग, आश्वासीत प्रगती योजना व इतर न्याय मागण्यासाठी आजपासून लेखणी बंद व ठीया आंदोलन सुरु केले आहे. 

या आंदोलनप्रसंगी सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना अध्यक्ष श्री. गजानन काशीद,उपाध्यक्ष श्री नितीन मुंडफणे, श्रीमती रुपाली हुंडेकर, महासंघ उपाध्यक्ष रविराज शिंदे, महासंघ प्रतिनिधी सोमनाथ सोनकांबळे, ऑफिसर फोरमचे अध्यक्ष श्री प्रशांत चोरमले, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप ,कास्ट्राईब कर्मचारी संघटना अध्यक्ष मलकारसिद्ध हैनाळकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वसंतराज सपताळे, सरचिटणीस रवीकांत हुक्कीरे यांच्यासह सर्वच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com