सोलापूर शहरासह मोहोळ, बार्शी, माढा तालुक्यात गारांचा पाऊस

अशोक मुरूमकर
Sunday, 1 March 2020

शेतकऱ्यांनी शेतात ज्वारी काढून ठेवली असून काही ठिकाणी पावासाने भिजून नुकसान झाले आहे. याबरोबर तूर, हरभार, गव्हाचे पावसाने नुकसान झाले आहे. सोलापूर शहरात रात्री १.२० मिनीटानी ढगांच्या गडगटासह पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरु होताच सात रस्ता परिसरात विज गायब झाली होती. ऐन उकाड्यात विज गायब झाल्याने नागरिक हैराण झाले. पावसाबरोबर जोरदार वारेही सुरु होते. तर मोहोळ, बार्शी, माढा तालुक्यात काही गारांसह पावसाने हजेरी लावली. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शनिवारी (ता. २९) रात्री काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये माढा तालुक्यात द्राक्षच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुगीच्या दिवसात अचानक झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. सध्या ज्वारीची काढणी सुरु आहे.
शेतकऱ्यांनी शेतात ज्वारी काढून ठेवली असून काही ठिकाणी पावासाने भिजून नुकसान झाले आहे. याबरोबर तूर, हरभार, गव्हाचे पावसाने नुकसान झाले आहे. सोलापूर शहरात रात्री १.२० मिनीटानी ढगांच्या गडगटासह पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरु होताच सात रस्ता परिसरात विज गायब झाली होती. ऐन उकाड्यात विज गायब झाल्याने नागरिक हैराण झाले. पावसाबरोबर जोरदार वारेही सुरु होते. तर मोहोळ, बार्शी, माढा तालुक्यात काही गारांसह पावसाने हजेरी लावली. 

Image may contain: plant, night, tree, outdoor and nature

मानेगावात मोठे नुकसान
मानेगाव (ता. माढा) :
माढा तालुक्यातील मानेगाव परिसरात शनीवारी रात्री साडेअकरा ते एक वाजेपर्यंत ढगाच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे मानेगाव, धानोरे, कापसेवाडी, बुद्रूकवाडी, केवड व वाकाव येथील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, तूर, हरभरा या पिकांच्या राशी भिजुन तोंडाला आलेला घास पुर्णपणे वाया जाण्याची भिती आहे. मानेगाव परिसरात द्राक्ष बागांचे मोठे क्षेत्र झाले. या पावसाने बागेत द्राक्ष घड मनी मोठ्या प्रमाणात पडले आहेत. शेतकऱ्यांसाठी विषेशता द्राक्ष बागायतदारांसाठी हा पाऊस मोठे लाखो रूपयांचे नुकसान करणारा ठरणार असल्याने शेतकरी चिंताक्रांत आहेत.

बार्शी शहर, परिसरात मुसळधार पाऊस 
प्रशांत काळे :
बार्शी शहर व तालुक्यात अवकाळी पावसाने शनिवारी रात्री बारानंतर जोरदार हजेरी लावली . यात द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होणार असून शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस सूरू होताच विज गायब झाली आहे. तालुक्यातील पानगाव, मळेगाव, पिंपरी या भागातही पाऊस झाला असून शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
-
मोहोळ तालुक्यात गारा
गो. रा. कुंभार :
मोहोळ तालुक्यातील नरखेड परिसरा लगत असलेल्या मोहोळ, माढा व बार्शी तालुक्याच्या सीमावर्ती भागात आवकाळी पावसाला शनिवारी मध्यरी सव्वाबाराला सुरवात झाली. यात तालुक्याच्या उत्तर भागातीला बार्शी तालुक्यात व पश्चिम भागातील माढा तालुक्यातून वादळी वारे वाहु लागले. त्यानंतर रिमझिम व मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरवात झाली. आवकाळी पावसामुळे ज्वारी, गहु हरभरा, द्राक्षे, काढणीला आलेला कांदा आशा विविध पीकांचे नुकसान झाले.  मध्यरात्री पाऊस आल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली होती. तर काही शेतकरी चिंताग्रस्त घरातूनच ढगाकडे बघत बसण्याशीवाय पर्याय नव्हता. यातच वीज गायब झाली.

देगाव, भैरववाडी, मनगोळी शिवारात पाऊस
रमेश दास :
वाळूज (ता. मोहोळ) परिसरातील देगाव, भैरववाडी, मनगोळी शिवारात रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी जोरदार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे. वादळी वाऱ्यामुळे वीज गायब झाली आहे.  सध्या ज्वारीची सुगी सुरू असून शेतात ज्वारीची काढणी, मोडणी व मळणीचा हंगाम सुरू आहे. शेतात काढून टाकलेली ज्वारी पावसाने भिजल्यामुळे काळी पडून ज्वारीच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. ज्वारीबरोबरच गहू, हरभरा, मका या पिकांचेही नुकसान झाले आहे. या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल झाला असून ऐन मध्यरात्री नंतर बरसलेल्या या पावसामुळे शेतातील होणारे नुकसान पाहत बसण्याशिवाय शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नाही. सध्या द्राक्षबागा उभ्या असून काढणीयोग्य व पक्व झालेला द्राक्षाचा माल उतरणीचा हंगाम सुरू आहे. अशातच अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडा टात लावल्या हजेरीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला असून ,या अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain with hail in Mohol Barshi and Madha taluka with Solapur city