
बी-बियाणे व खतांची सध्या जमवाजमव करू लागले आहेत. मृग नक्षत्रात अनेक वर्षांनंतर समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
रोपळे बुद्रूक (सोलापूर) : पंढरपूर शहर व तालुक्यात मंगळवारी (ता. 16) मृगाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांनंतर पंढरपूर तालुक्यात मृग नक्षत्राच्या पावसाची सर्वदूर हजेरी लागली. या पावसामुळे पंढरपूर तालुक्यात 23.55 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस पडल्यामुळे आता शेतकरी खरीप हंगामातील पेरणीच्या तयारीला लागले आहेत.
हेही वाचा : उजनीच्या लाभक्षेत्रात पावसाने शेतकऱ्यांना दिलासा
अनेक वर्षांनंतर तालुक्यात मृगाच्या सरी
तालुक्यात थोड्या फार प्रमाणात पूर्वमोसमी पाऊस पडला होता. त्यातच आता अनेक वर्षांनंतर तालुक्यात सर्वदूर मृगाच्या सरी बरसल्या आहेत. या पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल तयार झाली आहे. पेरणीयोग्य जमिनीत ओलावा निर्माण झाल्यामुळे शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागले आहेत. बी-बियाणे व खतांची सध्या जमवाजमव करू लागले आहेत. मृग नक्षत्रात अनेक वर्षांनंतर समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
हेही वाचा : स्ट्रॉंग बिअरसाठी 21 वर्षे तर लिकरसाठी 25 वर्ष वयाचा द्यावा लागणार पुरावा
खात्री करूनच त्याची पेरणी करावी
शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बी -बियाणे जमिनीत पुरेशी ओल झाल्याची खात्री करूनच त्याची पेरणी करावी.
- मोहन कासट,
संचालक, प्रेरणा बीज भांडार, पंढरपूर
कडधान्याची पेरणी
अनेक वर्षांनंतर मृगाचा चांगला पाऊस पडल्यामुळे आम्ही कडधान्याची पेरणी करण्यासाठी तूर व उडदाचे बियाणे खरेदी केले आहे.
- संजय रितुंड,
शेतकरी, रोपळे बुद्रूक, पंढरपूर
पंढरपूर तालुक्यात मंडलनिहाय पाऊस (मिमी)
सरासरी पाऊस 23.55 मि. मी.
आज अखेर सरासरी पाऊस 95.29 मि.मी.