पंढरपूर शहर व तालुक्‍यात रॅपिड अँटीजन टेस्टमुळे वेगाने रुग्णांचा शोध 

अभय जोशी
गुरुवार, 9 जुलै 2020

पंढरपूर शहर व तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व इतर लोकांच्या कोरोना चाचण्या तातडीने होणे गरजेचे झाले आहे. हे लक्षात घेऊन पंढरपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात आणि वाखरी येथील कोव्हिड केअर सेंटर मध्ये आता टेस्ट लॅब चालू केल्या जाणार आहेत.

पंढरपूर(सोलापूर)ः शहर व तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे आता उपजिल्हा रुग्णालयात आणि वाखरी येथील एमआयटी मधील कोव्हिड केअर सेंटर मध्ये रॅपिड एंटीजन टेस्ट केल्या जाणार आहेत.

हेही वाचाः पंढरपूरमध्ये दोन कोटी रुपयाचे होणार पन्नास बेडचे कोविड हॉस्पिटल 

पंढरपूर शहर व तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व इतर लोकांच्या कोरोना चाचण्या तातडीने होणे गरजेचे झाले आहे. हे लक्षात घेऊन पंढरपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात आणि वाखरी येथील कोव्हिड केअर सेंटर मध्ये आता टेस्ट लॅब चालू केल्या जाणार आहेत. त्यासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्‍नीशियन, डाटा एंट्री ऑपरेटर आदींना काल सोलापूर येथील डॉक्‍टर वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर आज पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील उर्वरित वैद्यकीय अधिकारी आणि संबंधितांना ही प्रशिक्षण देण्यात आले. 
आयसीएमआरच्या गाईडलाईन नुसार स्वॅब घेऊन संबंधितांचे रिझल्ट अपलोड करावे लागतात. हेल्थकेअर प्रोफेशनल किंवा फ्रन्टलाइन वर्कर म्हणून जे काम करत आहेत अशा लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांची ही टेस्ट केली जाणार आहे. 

टेस्टचा प्रभावी उपयोग करण्याचे प्रयत्न 
संबंधितांचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर तातडीने पुढील उपचार केले जाणार आहेत. परंतु रिझल्ट निगेटिव्ह आला आणि पुन्हा पुढील सात दिवसात लक्षणे दिसू लागली तर टेस्ट रिपीट करावी लागणार आहे. 
- डॉ.जयश्री ढवळे, वैदकीय अधिक्षिका, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर 

संपादन - प्रकाश सनपूरकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rapid antigen test in Pandharpur city and taluka for rapid search of patients