बार्शीतील 16 ग्रामपंचायती व 227 उमेदवार बिनविरोध ! राऊत, सोपलसह आंधळकर, मिरगणे गटांत लढत 

Barshi GP
Barshi GP

बार्शी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, 16 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 824 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. 227 उमेदवार बिनविरोध निवडले असून 798 जागांसाठी 1 हजार 287 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत तर 10 जागा रिक्त आहेत. आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासह शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र मिरगणे यांच्या गटांमध्ये निवडणूक रंगणार आहे. 

ग्रामपंचायती व रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे 
तुळशीदासनगर 18, अलिपूर 14, यावली 19, गाताचीवाडी 12, निंबळक 8, पिंपरी पा 18, सारोळे 18, चिखर्डे 26, तडवळे 24, जामगाव आ 19, इर्लेवाडी 4, मानेगाव 5, अरणगाव 6, आळजापूर 16, बाभूळगाव 6, आंबेगाव 8, आगळगाव 26, बळेवाडी 3, बावी 22, बाभूळगाव 6, बोरगाव (खुर्द) 14, भालगाव 18, भानसळे 4, भातंबरे 21, भोईंजे 27, चारे 21, दडशिंगे 2, धामणगाव (दु) 3, धानोरे 14, ढोराळे 14, इंदापूर 4, गोरमाळे 18, गुळपोळी 22, गौडगाव 5, घाणेगाव 27, घोळवेवाडी 8, हिंगणी पा 6, जामगाव (आ) 19, कव्हे 17, कळंबवाडी पा 14, कळंबवाडी (आ) 15, कासारी 14, कासारवाडी 19, कांदलगाव 12, काटेगाव 18, कुसळंब 23, कोरफळे 24, कोरेगाव 14, खांडवी - गोडसेवाडी 31, तांबेवाडी लमाणतांडा 24, महागाव 14, ममदापूर 15, मळेगाव 22, नारी 22, नागोबाचीवाडी 18, नांदणी 16, पाथरी 12, पांगरी 19, पांढरी 19, पिंपळगाव (धस) 18, पिंपळवाडी 14, पिंपरी (आर) 10, साकत 17, सासुरे 23, सावरगाव 2, सौंदरे 10, शिराळे 17, शेंद्री 19, शेळगाव (आर) 33, श्रीपतपिंपरी 25, तावडी 12, तुर्कपिंपरी 14, उपळाई ठोंगे 39, उक्कडगाव 18, उपळेदुमाला 44, वाणेवाडी 9, वालवड 21, यावली 19, झरेगाव 11 अशा 94 गावातील 1 हजार 287 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

तालुक्‍यातील या ग्रामपंचायती झाल्या बिनविरोध 
भोयरे, जामगाव (पा), खडकलगाव, मुंगशी (आर), पिंपळगाव (पा), जहानपूर, मालवंडी, शेळगाव व्हळे, धामणगाव (आ), धोत्रे, हळदुगे, कापसी, खडकोणी, खामगाव, रातंजन, सर्जापूर. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com